मंगळवेढा (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मंगळवेढा शाखेची बैठक आंधळगाव येथे संपन्न झाली, तर सांगोला शाखेची बैठक सांगोला येथे संपन्न झाली. यावेळी दोन्ही शाखांचे अध्यक्ष विठ्ठल ताटे व भारत लवटे यांनी आपापल्या तालुक्यातील शाखेच्या कामांचा तसेच संघटनात्मक बांधणीचा आढावा सादर केला व जिल्हा स्तरावरुन पाठपुरावा करावयाच्या प्रश्नांबाबत माहिती दिली. तसेच यावेळी आगामी काळातील विविध शिक्षक पतसंस्था व बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या.
मंगळवेढा शाखा बैठकीत अरुण पाटील, अमित भोरकडे, सुर्यकांत जाधव, रावसाहेब सुर्यवंशी, शिवाजी शिलेदार, राजाराम केदार, पांडुरंग शिंदे, काका चव्हाण, चंद्रकांत पवार, भारत बिले, गजानन लिगाडे, सुभाष वाघमारे, राजेंद्र कांबळे, मारुती मेटकरी यांनी विविध विषयांवरील चर्चेत आपली भूमिका मांडली. तर सांगोला येथील बैठकीत जिल्हा सोसायटीचे माजी चेअरमन भारत कुलकर्णी, एकनाथ जावीर, हमजूभाई मुलाणी, पतंगराव बाबर, जुंदळे गुरुजी, संतोष ननवरे, संतोष कांबळे, आबासाहेब पांढरे, रमजान तांबोळी यांनी विविध मुद्दे उपस्थित करुन संघटना बांधणी व कामकाजाबाबत चर्चेत सहभाग नोंदवला.

यावेळी शिक्षक समितीचे पदाधिकारी सर्वश्री राजेंद्र नवले, सुरेश पवार, अमोघसिद्ध कोळी, डॉ. सचिन लादे यांनी सर्वांची मते जाणून घेऊन आगामी काळात शिक्षक समितीची वाटचाल कशा पद्धतीने असेल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश साळुंखे, राजेंद्र माने, पंढरपूर शाखेचे उपाध्यक्ष सुनिल अडगळे हे देखील दोन्ही शाखेतील संवाद बैठकीत सहभागी झाले होते. दोन्ही तालुक्यातील क्रियाशील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी या बैठकांतून नेमके मार्गदर्शन करण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng