शिक्षक सहकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या विस्तार जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र जेटगी तर, जिल्हा संघटकपदी सुनिल पवार यांची बिनविरोध निवड

सोलापूर (बारामती झटका)

आज माळकवठे ता. दक्षिण सोलापूर येथे शिक्षक सहकार संघटनेचे पुणे विभाग सरचिटणीस यांच्या सुचनेनुसार जिल्हा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांच्या नेतृत्वात व पुणे विभागीय सरचिटणीस दिपक परचंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जिल्हा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेमध्ये शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक सहकार संघटना नेहमी प्रयत्नशील असल्याचे मत जिल्हा कोषाध्यक्ष सचिन निरगिडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मांडले. संघटना नेहमी सर्वात तळातील शिक्षकांचे प्रश्न सोडवत आहे. यामध्ये वेतननिश्चिती करताना सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करणे, जुनी पेंशन या मागणीसाठी चळवळ अधिक गतिमान करणे, केंद्रप्रमुख पदोन्नती, मेडीकल बिलांची सर्व प्रकरणे तातडीने मंजूर करणे, डाॅ.चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजुर करणे, समाजशास्ञ ऐच्छिक नकार व विज्ञान पदोन्नती, रॅण्डमग्रस्त शिक्षकांचे समुपदेशन, आंतरजिल्हा आपसी सेवा ज्येष्ठता, जिल्हा शिक्षक सोसायटी निवडणूक या सर्व प्रश्नांवर चर्चा करून प्रशासनाने हे सर्व प्रश्न सोडवून अन्यायग्रस्त शिक्षक बांधवांना न्याय देण्यासाठी शिक्षक सहकार संघटना प्रयत्नशील असल्याचे मत विभागीय सरचिटणीस दिपक परचंडे यांनी मांडले. सदर सभेमध्ये जिल्हा कार्यकारणीचा प्रस्ताव मांडून सर्वानुमते जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र जेटगी तर, जिल्हा संघटकपदी सुनिल पवार यांची बिनविरोध निवड केली. सदर निवडीचे निवड व अभिनंदन पञ जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांच्याहस्ते देण्यात आले. ही सभा यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा तालुका अध्यक्ष विजय बबलेश्वर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण राठोड, सिध्दया कोळी, राजकुमार कोळी, राजू राठोड, सोमलिंग बिराजदार, विठ्ठल पाटील, राजेंद्र वाघमोडे, मंगेश नकाते आदींनी परीश्रम घेतले.

सदर सभेसाठी जिल्ह्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील निवडीसाठी राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, उपाध्यक्ष निलेश देशमुख, राज्य संघटक विठ्ठल टेळे, महिला राज्याध्यक्ष उमा घोरपडे, पुणे विभाग प्रमुख मनोज कोरडे, नागपूर विभाग प्रमुख रवी अंबुले, नाशिक विभाग प्रमुख अविनाश जुमडे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सदरील सभेचे सुञसंचालन रामसिंग पवार तर आभार सिध्दराम कोळी यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleछत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये भूगोलशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह-मेळावा उत्साहात संपन्न
Next articleस्वेरीच्या थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here