अकलूज (बारामती झटका)
सुसंस्कृत व आदर्श नागरिक घडविणारे शिक्षकच आदर्शवत राष्ट्र निर्माण करण्याचे महान कार्य करीत असल्यानेच ‘राष्ट्र निर्माण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी प्रांतपाल सी. ए. व्यंकटेश चन्ना यांनी केले.
रोटरी क्लब अकलूजच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील 17 शिक्षकांना “राष्ट्र निर्माण पुरस्कार” सीए व्यंकटेश चन्ना आणि गटशिक्षणाधिकारी मा.श्री.धनंजय देशमुख यांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, रोटरीचे अध्यक्ष सी. ए. नितीन कुदळे, सचिव गजानन जवंजाळ, प्रकल्प संचालक विरेन गांधी, प्रकल्प प्रमुख दत्तात्रय नलवडे, खजिनदार नवनाथ नागणे, सुशिल व्होरा, गौतम गांधी, दिपक फडे, योगेश व्होरा, आशिष गांधी, स्वप्निल शहा, संतोष पवार, संदीप देसाई, अमेय व्होरा, मकरंद जामदार यांच्यासह सत्कारमुर्ती शिक्षक व त्यांचे कुटुंबीय व सहकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक धनाजी जाधव देशमुखवाडी, पोपट पालवे इस्लामपूर, सिताराम ढेकळे बागेचीवाडी, महादेव सरवदे निमगांव(म), अर्चना वाघ मुंडफणेवाडी (महाळुंग), सचिन पुराणे नरुटे मदनेवस्ती, कांतीलाल पोतलकर फोंडशिरस, सारीका जामदार (मुले) पिलीव, धनंजय गोडसे सरस्वतीनगर (कोळेगांव), सचिन बरडकर चव्हाणवाडी (बांगर्डे), नागन्नाथ शिंदे कारुंडे, प्रविण कळसाईत माळखांबी, लता निंबाळकर पंचवटी (अकलुज), सुनिल बामणे सेक्शन १६ नेवरे, संचिता ठोंबरे पवारवस्ती गिरझणी, विठ्ठल पिसे बा. ज. दाते प्रशाला नातेपुते व भगवान शिंदे गोपाळराव देव प्रशाला माळशिरस यांना “राष्ट्रनिर्माण पुरस्कार” देवुन सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो. सी. ए. नितीन कुदळे यांनी रोटरी क्लब शैक्षणिक, वैद्यकीय तथा आरोग्य क्षेत्र, महिला व मुली सक्षमीकरण, जलसंधारण, पर्यावरण, शांतता आणि युवापिढी अशा विविध स्तरावर भरीव कार्य करत असल्याचे सांगत रोटरीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि समाजातील खऱ्या गरजवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर गटशिक्षणाधिकारी मा.धनंजय देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना रोटरी क्लब हे विविध माध्यमातून शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमातून सातत्याने सहकार्य करत असल्याचे सांगत जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यामध्ये रोटरीचा मोठा वाटा असल्याचे सांगत रोटरी क्लब चे सर्व उपक्रम हे स्तुत्य व बहुउपयोगी असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास उरवणे सर व राजाराम गुजर यांनी केले तर आभार सचिव गजानन जवंजाळ यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
