इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
इंदापूर तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासनास मदतीसाठी युवा सेनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी तत्पर राहतील. त्यासाठी आरोग्य खात्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मार्फत लसीकरण उपक्रम राबवून प्रधान्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड लसीकरण करण्यात यावे. लसीकरण मोहीम राबवत असताना युवा सेनेचे पदाधिकारी प्रशासनास मदतीसाठी तयार आहेत. गरज वाटेल त्या ठिकाणी आपल्या मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत, अशा आशयाचे निवेदन जीवन सरतापे, आरोग्य अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांना युवा सेनेच्यावतीने देण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी बिगीन अगेन अंतर्गत “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” अभियानातून शिक्षणाची गंगा राज्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व घटकांनी जोमाने काम करावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे .याचाच एक भाग म्हणून पर्यटनमंत्री मा. ना. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले इंदापूर तालुक्यातील युवा सेनेचे सर्व पदाधिकारी या लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी तत्पर राहतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हा युवा अधिकारी कुलदीप भैय्या निंबाळकर, तालुका युवा अधिकारी सचिन इंगळे, तालुका समन्वयक विनायक लोंढे, उपतालुका युवा अधिकारी योगेश हरिहर व युवासैनिक उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng