शिक्षण क्षेत्राला बसला हादरा, जिल्ह्यात १७१ बोगस शिक्षक

सोलापूर (बारामती झटका)

राज्यात बोगस डॉक्टर असल्याचे सर्वांनाच माहिती आहे पण आता नवी पिढी घडविणारे शिक्षक देखील बोगस असल्याचे धक्कादायक वृत्त उजेडात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी १५ जणांवर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असतानाच राज्यातील बोगस शिक्षकांची आकडेवारीच एका वाहिनीने जाहीर केली असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात १७१ बोगस शिक्षक असल्याचे समोर आले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराने शिक्षण क्षेत्र हादरून गेलेले असून अनेक बडे मासे कायद्याच्या गळाला लागले आहेत. मोठी रक्कम घेऊन अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपले हात काळे केले आहेत. त्यामुळे पैसे देऊन शिक्षक झालेल्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे. शिक्षक भरती घोटाळा चर्चेचा विषय बनला असतानाच राज्यातील बोगस शिक्षकांची जिल्हानिहाय आकडेवारी देखील समोर आली आहे.

राज्यातल्या विविध जिल्ह्यात ७८८० बोगस शिक्षक कार्यरत असून त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे मिळाली आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात १७१ बोगस शिक्षक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर पुणे जिल्ह्यात ३९५, कोल्हापूर जिल्ह्यात १२६, सातारा जिल्ह्यात ५८, सांगली जिल्ह्यात १२३, लातूर जिल्ह्यात १५७, उस्मानाबाद जिल्ह्यात ४६, नाशिक जिल्ह्यात ११५४, धुळे जिल्ह्यात १००२, आणि नंदुरबार जिल्ह्यात ८०८ अशी मोठी संख्याही काही जिल्ह्यातून समोर आली आहे.

शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून उद्याची पिढी घडवण्याचे महान आणि आव्हानात्मक काम हे शिक्षक करीत असतात. पण शिक्षकच बोगस असेल तर नवी पिढी कशाप्रकारची घडू शकेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शासन आणि विद्यार्थी यांचीही फसवणूक करणाऱ्या या बोगस शिक्षकांचे बिंग आता फुटले असून शिक्षण क्षेत्राला देखील हादरा बसला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleखंडाळी हायस्कूल मध्ये १० वी ची परीक्षा सुरु…
Next articleकृषी खात्याच्यावतीने चालू असलेल्या योजनांचा लाभ घ्या – उमेश मोहिते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here