शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस संग्रामनगर ग्रामपंचायतींच्या वतीने सामाजिक उपक्रमाने साजरा

अकलूज ( बारामती झटका )

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामनगर ग्रामपंचायतीच्यावतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माळशिरस तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व संग्रामनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीराजभैय्या नंदकुमार माने पाटील यांच्या सहकार्याने संग्रामअण्णांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

त्यामध्ये संग्रामनगर ग्रामपंचायतीच्यावतीने श्री. संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या ५% दिव्यांग कल्याण निधीतून संग्रामनगरमधील दिव्यांग बांधवांना सहाय्यक अनुदानाचे वाटप करण्यात आले. अनुदान चेक स्वरूपात दिव्यांग बांधवांना देण्यात आले. ग्रामपंचायतीच्या १०% महिला बालकल्याण निधीतून अंगणवाडीसाठी वजनकाटे देण्यात आले. संग्रामनगरमधील सर्व अंगणवाडींना १५ वा वित्त आयोगातून गॅस संचचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी बालवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. कमालभय शेख, ग्रामपंचायत सदस्य श्री. पंकज गाडे, श्री. सुदेश रासकर, श्री. संजय सोनवणे, श्री. अजित रेवंडे, सौ. आशा सावंत, सौ. स्मिता माने-देशमुख, सौ. निर्मला जाधव, ग्रामविकास अधिकारी श्री. सुधाकर मुंगूसकर यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, युवा नेते संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील यांना वाढदिवसानिमित्त बारामती झटका परिवार यांचेकडून लाख लाख शुभेच्छा… अण्णासाहेब आपणांस उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व अकलूजचे ग्रामदैवत अकलाई मातेस साकडे. हितचिंतक श्रीनिवास कदम पाटील संपादक बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल संपर्क 98 50 10 49 14 धन्यवाद.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराजेंद्र काशिनाथ चिखले ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित
Next articleकेळीचा रोपांचा काळाबाजारोप १७ रुपयाचे २७ रुपयांनी विक्री, दलालांचा सुळसुळाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here