मळोली ( बारामती झटका )
शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संग्रामसिंह मोहिते पाटील यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल मळोलीकरांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मळोली गावचे माजी उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, मळोली गावचे माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासो जाधव पाटील, मळोली गावचे जेष्ठनेते जगन्नाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य भीमराव मोरे, बळीराम जाधव, नवनाथ जाधव, सौरभ जाधव, संजय पवार, शिरीष पाटील, नाना जाधव, पांडुरंग निंबाळकर, रोहित निंबाळकर, निलेश जाधव, बबलू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

संग्रामसिंह मोहिते पाटील आणि मळोली गावातील युवकांचा घनिष्ठ संबंध होता. संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाची मळोली गावामध्ये सर्वात मोठी शाखा होती. मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव यांच्याकडे मित्र मंडळाच्या पूर्व विभागाची अध्यक्ष पदाची जबाबदारी होती. संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय लेझीम स्पर्धा आयोजित केली जात असे. त्यावेळी मळोलीकरांचा सहभाग नेहमी असत. मळोली गावचे व संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे अतूट नाते बनलेले आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान मळोलीकरांच्यावतीने करण्यात आलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng