शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संग्रामसिंह मोहिते पाटील यांची निवड.


अकलूज ( बारामती झटका )

आशिया खंडातील सुप्रसिद्ध असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये एक मताने अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी निवासस्थानी जाऊन सन्मान केला.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयांमध्ये संचालक मंडळाची बैठक आयोजित केलेली होती. यावेळी संचालक सुभाष दळवी , बाळासाहेब सणस, राजाभाऊ लव्हाळे, नवनाथ फुले ,पांडुरंग एकतपुरे, निशा गिरमे ,उत्कर्ष शेटे, वसंत जाधव, सचिव अभिजीत रणवरे सहसचिव हर्षवर्धन खराडे आदी उपस्थित होते.सदरच्या बैठकीमध्ये सर्वानुमते संग्रामसिंह मोहिते पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.


शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 23 जून 1948 साली झालेली आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या एकूण 55 शाखा आहे प्राथमिक शाळा 8 माध्यमिक शाळा 33 महाविद्यालय 7 वसतीगृह 5 व्यवसाय अभ्यासक्रम 2 अशी आहेत विद्यार्थ्यांची संख्या 29134 एवढी आहे एकूण शिक्षक व शिक्षकेतर संख्या 1182 आहे संस्थेचे कृषी महाविद्यालय, डी फार्मसी, बी फार्मसी ,कृषी तंत्र निकेतन, दुग्ध व्यवसाय अभ्यासक्रम आहेत,
शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपरणी मोहिते पाटील यांच्या सहकार्याने माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे संभाळून नवीन सुधारणा करून संस्थेचा प्रगतीचा आलेख चढता ठेवून टाकलेला विश्वासाला सार्थ करून दाखवणार असल्याचे मत नूतन अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी औपचारिक चर्चा करीत असताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज येथे हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान
Next articleसंग्रामसिंह मोहिते-पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज या संस्थेच्या अधक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here