घुलेनगर येथे शिखर शिंगणापूर यात्रेसाठी जाणार्‍या भक्तांसाठी, फलटन धुळोबा भिवाई व पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी पाणपोईचे नियोजन

घुलेनगर (बारामती झटका)

पानीव ता. माळशिरस येथील घुलेनगरचे जेष्ठ नागरिक म्हणून बळीबा सोपान घुले यांनी कोरोना काळात २० स्कोर असतानासुद्धा या महान नशिबवान आजोबांनी वयाच्या १०० व्या वर्षी मात केली. शिखर शिंगणापूर यात्रेसाठी जाणार्‍या भाविक भक्तांसाठी व फलटन धुळोबा भिवाई व पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी उन्हाळ्याच्या दिवसांचा विचार करुन माऊली ग्रुप घुले नगर यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे पाणपोईचे नियोजन केले जाते. या पाणपोईचे उदघाटन बळीबा सोपान घुले यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी माऊली ग्रुपचे अध्यक्ष भावी सरपंच पाणीव -घुलेनगर आप्पासाहेब मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेब मारकड, शंकर घुले, अमृत घुले, दत्तात्रय घुले, दत्तात्रय शिंदे, राजु बुधनवर, विजय घुले, सौरभ साठे, अजय घुले सदर पाणपोईचे नियोजन करण्यात आले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleAdvance America Boynton Beach, Fl 33426
Next articleधर्मपुरी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचा धुरळा उडाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here