शितल चौगुले “उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शीका 2022” पुरस्काराने सन्मानीत

मुंबई (बारामती झटका)

येथील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शीका शितल चौगुले यांना “उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शीका” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. महाराष्ट्र सिने न्युज व न्यु चैतन्य मुव्हीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत औरंगाबाद येथे नुकताच पार पडलेला “महाराष्ट्र सिने अवार्ड 2022” या कार्यक्रमात येथील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शीका शितल चौगुले यांना “उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शीका 2022” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीचे संस्थापक अध्यक्ष राजुभाई साबळे, चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे, जेष्ठ सिनेअभिनेते बाबूराव आर्दड, जेष्ठ सिनेअभिनेते मदन गायकवाड यांची प्रमुख उपस्थीती होती. नवोदीत कलाकारांना प्रोत्साहीत करण्यासाठी हा अवार्ड देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी अनेक सिने कलाकार/नृत्य दिग्दर्शक यांना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांनी आपल्या भाषणात बोलतांना सांगीतले की, कला ही जीवंत आहे, तीला मरु देवू नका, उदार न होता आपला अभिनय निर्भीडपणे साकारा व तळागळातील कलाकारांनी एकत्रीत एऊन लढा देवूया. तसेच प्रत्येक कलाकारांनी अभिनयाच्या नऊरसांचे अभ्यास करून घ्यावे. तरच आपण उत्कृष्ट/नृत्य, अभिनय सादर करु शकतो व यशाच्या शिखरावर जावू शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.

या प्रसंगी अनेक कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास वाल्मीक चांदने, अरुण गुर्हळकर, प्रविण भालेराव, सुनिता भालेराव, विनोद बोडखे, विशाल जोहरे, उमेश जाधव, प्रियंका कांबळे, सुनिता काकडे, सोनीया इंगळे, संदिप बनकर, आत्माराम मते, दिलीप घेवंदे, कैलास झीने, महेश आर्दड, आदी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थीत होते. शेवटी कार्यक्रमाला सदिच्छ भेट देण्यासाठी आला बाबूराव फेम सुरेश कांबळे यांनीही हजेरी लावली.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल कोरके यांनी केले तर महेंद्र भारसाखळे यांनी आभार प्रदर्शन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि.सौ.कां. डॉ. वर्षाली वाघमोडे पाटील, फोंडशिरस आणि चि. डॉ. जयराम रूपनवर पाटील, एकशिव यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.
Next articleजिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here