शिरवाडे वणी (बारामती झटका)
शिरवाडे वणी ग्रामपंचायतीच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिरवाडे गावचे भूषण कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन, जागतिक मराठी राजभाषा दिन सोहळा व निमंत्रितांचे कवी संमेलन रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दु. २ वा. कविवर्य कुसुमाग्रज स्मारक, शिरवाडे वणी, ता. निफाड येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड विधानसभा मतदार संघाचे सदस्य आमदार दिलीपकाका बनकर हे असून प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, पालखेड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. मंदाकिनी बनकर, माजी विधान परिषद सदस्य नानासाहेब बोरस्ते हे असणार आहेत.
या सोहळ्याप्रसंगी तुकाराम धांडे, मधुकर जाधव, विष्णू थोरे, विजयकुमार मिठे, संतोष वाटपाडे, प्रा. कैलास सलादे, विवेक उगलमुगले, रवींद्र मालुंजकर, राजेंद्र उगले, राजेंद्र सोमवंशी, सोमनाथ पवार, प्रा. गुरुदेव गांगुर्डे, प्रा. किशोर गोसावी, मुकुंद ताकाटे, सचिन गांगुर्डे, दत्ता सोनवणे, अमोल चिने, रवींद्र देवरे, जयश्री वाघ, शरद शेजवळ, रावसाहेब जाधव, सागर जाधव, संजय मोते, डॉ. शोभा जाधव/बोरस्ते, सरला देशमाने/मोते, काजल आहेर निर्मला खांगळ/ठोंबरे आधी कवींना निमंत्रीत करण्यात आले आहे.
सदर सोहळ्याप्रसंगी कविप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ शिरवाडे वणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng