नीरा नरसिंहपूर (बारामती झटका) बाळासाहेब सुतार यांजकडून
शिराळा गावचे शिवसेनाप्रमुख मा. सरपंच रेवनदादा ढोरे, प्रताप नाना ढोरे आणि शिवशंभू यात्रा कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेली यात्रा व शिवशंभूच्या पावन भूमीमध्ये शिराळा तालुका परंडा येथील कुलदैवत शिव शंभू महादेव यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. महादेवाची पुजा व नैवद्य देऊन नतमस्तक होऊन भाविक आपली मनोकामना पूर्ण करतात. या यात्रेला भाविकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेमध्ये अनेक भागातून आलेले मेवा, मिठाई, खेळण्याचे स्टॉलमुळे यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली असते. भाविक, लहान बालक व महिला उपस्थित राहून यात्रेचा आनंद घेत असतात. गावातून व अनेक भागातून भाविक भक्त आपली मनोकामना व नवस पूर्ण करण्यासाठी नतमस्तक होऊन शिवशंभुचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असतात.
सायंकाळी महादेवाचा छबिना व कावड घेऊन वाजत गाजत सर्व भावीक व ग्रामस्थांच्या उपस्थित गावामध्ये ग्राम प्रदक्षिणा आनंदाने घेण्यात आली. शिराळा येथील ग्रामदैवत शिवशंभो महादेव असल्याने तिसऱ्या दिवशी दि. 14 रोजी निकाली कुस्त्याचा जंगी आखाडा भरवण्यात येणार असल्याने सोलापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातून आनेक भागांतून नामांकित व आजी-माजी पैलवान हजर राहणार असल्याचे यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. इनाम रुपये 100 पासून ते 51 हजार रुपये पर्यंतच्या निकाली कुस्त्या होणार असल्याचे विद्यमान सरपंच रेवनदादा ढोरे व सामाजिक कार्यकर्ते प्रतापनाना ढोरे आणि शंभू महादेव यात्रा कमिटीच्यावतीने यावेळी सांगण्यात आले. शेवटी कुस्त्या झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng