नातेपुते (बारामती झटका)
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नातेपुते येते दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नातेपुते नगरपंचायत चे नूतन नगराध्यक्ष सौभाग्यवती उत्कर्ष राणी पलंगे तसेच नूतन नगरसेविका सौभाग्यवती दीपाताई देशमुख , सौभाग्यवती सुचित्रा वहिनी देशमुख, सौभाग्यवती संगीता ताई देशमुख, सौभाग्यवती राजश्री ताई मोरे, सौभाग्यवती मीनल कुलकर्णी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर जिजाऊ वंदना म्हणण्यात आले व दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी जिजाऊ ब्रिगेड नातेपुते या शाखेचे अध्यक्ष शिवमती पुष्पाताई सस्ते, उपाध्यक्ष स्नेहल ताई थोरात, सचिव शिवमती सारिका घेमद, कार्याध्यक्ष शिवमती उषाताई जाधव यांच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम घेण्यात आला, तसेच जिजाऊ ब्रिगेड नातेपुते चे मार्गदर्शक शिवमती अरुणाताई सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पुष्पा सस्ते यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवमती मनीषा जाधव जिल्हा उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार शिवमती सारिका घेमाड यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng