शिवपुरी येथे भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न

शिवपुरी (बारामती झटका)

दि.13 नोव्हेंबर शिवपुरी एकशिव ता.माळशिरस येथे श्री. दत्तात्रय शेळके साहेब यांच्या सहकार्याने श्री. शहाजीदादा धायगुडे सरपंच चषकाचे आयोजन श्रीकेश भैय्या वरुडे व मित्र परिवार शिवपुरी याचे वतीने करण्यात आलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पंचायत समिती सदस्य उद्योजक दत्तात्रय शेळके साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे एकशिव गावचे सरपंच शहाजीदादा धायगुडे,जिल्हाधिकारी शुभम जाधव,उद्योजक सतिष तात्या ढेकळे,पिरळे सरपंच संदीप नरोळे,रणवीर देशमुख,राजू गोसावी,प्रवीणशेट पांढरकर,गणेश बोराटे,बशीर काझी,गुणवंत पाटील,भाजपा तालुका उपाध्यक्ष भारत रुपणवर,गुरसाळे उपसरपंच अनिल मोरे,अमोल पाटील,दशरथ जाधव,अय्याज मुलाणी,पोपट जाधव,राज माने,शिवेंद्र हुंबे,नवनाथ रुपणवर आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21021 रु एकच नाद पुरंदावडे यांनी जिंकले व हे बक्षीस दत्तात्रय शेळके साहेब यांचे वतीने देण्यात आले होते व शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक व द्वितीय बक्षीस 15015 रु शिवशंभो माळशिरस यांनी जिंकले तर हे बक्षीस उद्योजक सतिश तात्या ढेकळे व संदीप नरोळे सरपंच पिरळे यांच्या वतीने देण्यात आले होते व शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक व तृतीय बक्षीस 11011 रु जय शिवराय तांबेवाडी हे बक्षीस दशरथ जाधव व अय्याज मुलाणी याच्या वतीने देण्यात आले होते व शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक आणि चतुर्थ बक्षीस स्मृती क्रिकेट क्लब शिवपुरी यांनी जिंकले तर सदर कार्यक्रमध्ये पत्रकार,व कोरोना योद्धा यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर विशेष सत्कार उद्योजक दत्तात्रय शेळके यांना एकशिव ग्रामस्थांच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी विशेष सहकार्य व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्मृती क्रिकेट क्लब शिवपुरी टीमचे कॅप्टन इरफान मुलाणी यांचे मोलाचे योगदान लाभले त्याचबरोबर महेश कांबळे,प्रतिक वरुडे,ग्रा.सदस्य दत्ता कांबळे, नौशाद मुलाणी,सईद मुलाणी,सुमित चंकेश्वरा,विकास कांबळे, अनिस मुलाणी,अझर मुलाणी,दीपक झोडगे,अपसर मुलाणी,संस्कार होणराव पार्थ अहिवळे किरण जालोंदे, विठ्ठल कुचेकर अविनाश ओहळ,चंद्रकांत शिंगे,लखन बाबर,मॉन्टी रुपणवर,समीर माने व दादा खंडागळे व रजाक अत्तार सर यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी पार पडल्या.

यावेळी सर्व एकशिव ग्रामस्थ व माळशिरस,बारामती, इंदापूर फलटण तालुक्यातील 63 संघाणी सहभाग नोंदवला होता.यावेळी स्पर्धेचे आयोजन श्रीकेश वरुडे यांनी प्रास्ताविकातून सहभागी झालेल्या सर्व संघाचे आभार मानले सर्व कार्यक्रमाचे निवेदन श्री. सूर्यवंशी सर यांनी केले व या सुंदर स्पर्धेचे आयोजन श्रीकेश भैय्या वरुडे व मित्र परिवार शिवपुरी यांनी केले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसाखर कारखाना सुरू व्हावा शेतकऱ्यांची इच्छा, त्याहीपेक्षा ज्यादा इच्छा शेतकऱ्यांचे पैसे मिळावे – प्रकाशबापू पाटील.
Next articleउद्योजक दत्तात्रय शेळके यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here