जिद्द, चिकाटी, उद्दिष्ट आणि मातृत्व सांभाळत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदी महाराष्ट्रातून महिला खुल्या प्रवर्गातून प्रथम येण्याचा सन्मान सौ. सरला कदम यांना मिळाला.
नांदेड ( बारामती झटका )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020 स्पर्धा परीक्षेत शिवमती सरला राजकुमार कदम यांनी महाराष्ट्रातून महिला खुला प्रवर्गातून दैदिप्यमान यश संपादन करून खुल्या प्रवर्गात पहिला नंबर पटविण्याचा बहुमान मिळवून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झालेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील फळी या छोट्याश्या गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये राहत असणाऱ्या सौ. सरला कदम यांनी जिद्द, चिकाटी व उद्दिष्ट यामुळे दैदिप्यमान यश संपादन केलेले आहे. संसार करत लहान मुलीचा सांभाळ करून त्यांनी अभ्यास केलेला आहे. सरला कदम यांनी 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले होते. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा फॉर्म भरताना चुकीने ओपन जनरल करण्यात आला. ओपन महिलांपेक्षा 38 मार्क जास्त असूनसुद्धा संधी गमवावी लागलेली होती. तरीसुद्धा जिद्द व चिकाटी मनामध्ये ठेवून 2020 ला नवीन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये जोमाने अभ्यास करून मुलीचा सांभाळ केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये देदीप्यमान यश मिळविले. त्यांची सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदी निवड झालेली आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng