शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन युवा उद्योजक किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांची अलोट गर्दी.

अकलूज ( बारामती झटका )

शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन युवा उद्योजक किर्तीध्वजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरता उद्योग-व्यवसायातील मित्रमंडळी माता-भगिनी यांनी अलोट गर्दी केलेली होती. शिवकिर्ती युवा मंचाच्यावतीने किर्तीध्वजसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व विकास कामांचा शुभारंभ करून सर्वसामान्य जनतेच्या लोकउपयोगी विविध उपक्रम राबवून सप्ताहाचे आयोजन केले होते.

दि. 23 मार्च रोजी किर्तीध्वजसिंह यांना वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री स्वयंप्रभादेवी, धर्मपत्नी ईश्वरीदेवी, भाऊजय देवण्यादेवी यांनी औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. किर्तीध्वजसिंह यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील व उद्योजक महर्षी उदयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमांचे दर्शन करून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्यासह परिवारातील सदस्यांचा आशीर्वाद घेऊन कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यास सुरुवात केलेली.

उद्योगमहर्षी उदयसिंह मोहिते पाटील यांच्या पश्चात समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्याकडे पितृत्व आणि मातृत्वाची जबाबदारी आलेली आहे. ती त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. किर्तीध्वजसिंह आणि शिवतेजसिंह राम लक्ष्मणासारखी असणाऱ्या जोडीची उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. शिवरत्न उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उद्योग व्यवसाय यशस्वी सुरू आहेत. कीर्तीध्वजसिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता उद्योग-व्यापार, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रातील मंडळींसह महिला बचत गट, महिला मंडळ कर्मचारी कामगार अशा सर्व महिलांनी कीर्तीध्वजदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता अलोट गर्दी केलेली होती. आलेल्या सर्व लोकांची नाष्टा चहापानाची सोय केलेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला असल्याने शिवकिर्ती युवा मंचांच्या सर्व कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केलेला आहे. वाढदिवस साजरा करण्याकरता सज्जन दुरापे, प्रकाश गायकवाड यांच्यासह शिवरत्न उद्योग समूह परिश्रम घेत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचिंताजनक… कोरोना करतोय स्वतःमध्ये बदल
Next article१२५ वर्षांचे स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here