शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गारअकोले येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.

अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील व सौ. देवण्यादेवी मोहिते पाटील उभय पती-पत्नीच्या शुभहस्ते शुभारंभ.

गारअकोले ( बारामती झटका )

शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन युवा उद्योजक किर्तीध्वजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गारअकोले येथे रक्तदान शिबिर व विविध विकास कामांचा शुभारंभ अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील व सौ. देवण्यादेवी मोहिते पाटील उभय पती-पत्नींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

युवा उद्योजक कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवकिर्ती युवा मंचाच्यावतीने विविध विकासकामे व समाज उपयोगी कार्यक्रमाचा सप्ताह आयोजित केलेला आहे. गारअकोले येथे भव्य रक्तदान शिबिर परिसरातील नागरिकांना आरो फिल्टर वॉटर प्लांटचे लोकार्पण सोहळा, महिलांच्या अंगामधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केलेले होते. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवतेजसिंह मोहिते पाटील व सौ. देवण्यादेवी मोहिते पाटील होते.

यावेळी महिलांना बक्षीस वितरण व मानसन्मान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास कार्यकर्त्यांनी उदंड प्रतिसाद दिलेला होता. गारअकोलेचे उपसरपंच गोविंद भाऊ पवार यांच्यासह गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleएकशिव विकास सेवा सोसायटीवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा फडकला, भाजपचे विद्यमान सरपंच यांच्या मातोश्रींचा दारुण पराभव
Next articleआई-वडील जिवंत असेपर्यंत संपत्तीत मुलगा हक्क मागू शकत नाही – मे. मुंबई हायकोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here