अकलूज ( बारामती झटका )
शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी शंकरनगर, अकलूज कंपनीने महाराष्ट्रामध्ये बांधकाम व रस्त्याच्या कामामध्ये महाराष्ट्रात नाव केलेले होते. उद्योजक स्वर्गीय उदयसिंह मोहिते पाटील यांच्या मृत्यूनंतर कन्स्ट्रक्शन कंपनीचं कामकाज संथ गतीने सुरू होते. सध्या शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीने अद्यावत मशनरी बसवून कामकाज सुरू केलेले आहे. हळूहळू कंपनी बाळसे धरू लागलेली असल्याने थोड्याच दिवसात गतवैभव प्राप्त करेल, असे उद्योग क्षेत्रात बोलले जात आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे पश्चात राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने उद्योग महर्षी उदयसिंह मोहिते पाटील यांनी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केलेली होती. विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकारणामध्ये दैदिप्यमान कार्यकाल होता. त्यावेळेस अनेक मंत्रीपदाचा पदभार विजयदादांकडे होता. पंधरा वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री पदावर कार्यरत असताना शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीने अनेक ठिकाणी दर्जेदार कामे केलेली होती. गेल्या काही वर्षांमध्ये उदयसिंह मोहिते पाटील यांचे अकाली दुःखद निधन झालेले होते. उदयसिंह मोहिते पाटील यांनी शिवरत्न कन्स्ट्रक्शन, आनंदी गणेश ट्रस्ट, पुणे येथे उद्योग व्यवसाय असे सुरू केलेले होते. त्यांच्या पश्चात धर्मपत्नी श्रीमती स्वयंप्रभा देवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किर्तीध्वजसिंह व शिवतेजसिंह यांनी वडिलांचे व्यवसाय सुरू केलेले होते. सुरुवातीस अनंत अडचणीवर मात करीत उद्योग व्यवसाय सुरू होता. स्पर्धेच्या युगात नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याचे काम सुरू केले. सुरुवातीस क्रशसॅन्ड प्लांट सुरू केला. अद्यावत मशनरी बसवून फेवर नंबर हॉट मिक्सिंग प्लांट बसवून घेतले. उदयबापूनी अक्का साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विजय दादा यांच्या सहकार्याने गगन भरारी घेतलेली होती. सध्या कीर्ती दादा आणि शिव बाबा स्वयंप्रभादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीतदादांच्या सहकार्याने शिवरत्न कंस्ट्रक्शन कंपनी गतवैभव प्राप्त करण्याकरिता बाळसे धरू लागलेली आहे.
शिवरत्न कंस्ट्रक्शन कंपनीकडे अनेक कामे सुरू आहेत श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे अकलूज ते तोंडले-बोंडले 22 किलोमीटर पालखी महामार्गाचे साडे तीनशे कोटी रुपयाचे काम सुरू आहे सदरचे काम प्रगतिपथावर आहे. उद्योग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा गरुड भरारी शिवरत्न कंस्ट्रक्शन घेऊन गतवैभव प्राप्त करेल असा विश्वास उद्योग व्यवसायिक यांच्यामधून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng