शिवशंकर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शशांकभैया जाधव पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी संतोष घोरपडे

मळोली ( बारामती झटका )

शिवशंकर विकास सेवा सोसायटी मळोली पाटीलवस्ती या सोसायटीच्या चेअरमनपदी शशांक बाळासो जाधव पाटील तर संतोष विठ्ठल घोरपडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या मळोली येथील शिवशंकर विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली.

यामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी कोरे यांनी जाहीर केली. शेतकरी सभासद बांधवांच्या प्रगतीसाठी सोसायटी नेहमीच अग्रेसर भूमिका घेत असते मळोलीचे माजी उपसरपंच तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव व ॲड. राजेंद्र पवार, शिवाजीबापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोसायटी कार्यरत आहे. सदर निवडणूक पार पडल्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सन्मान सभासद बांधवांनी जल्लोषात केला.

यावेळी चंद्रकांत रामचंद्र जाधव, अनिल महादेव जाधव, महादेव शिवाजी जाधव, जयराम महादेव जाधव, अरुण श्रीमंत पवार, हनुमंत यशवंत जाधव, अंकुश सायाप्पा देवकते, सुरेखा रवींद्र फडतरे, नीलावती लिंबराज पवार, ज्ञानेश्वर हनुमंत ढेंबरे,भानुदास नारायण तुपे आदि संचालक बांधव उपस्थित होते. तसेच याप्रसंगी जगन्नाथ तुकाराम जाधव व दत्तात्रय नानासो जाधव यांची तज्ञ संचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदर निवडणुकीसाठी सचिव मारुती मोकळे यांनी काम पाहिले. या निवडीचे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आले तर यावेळी धर्मराज जाधव, माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासो जाधव पाटील, माजी चेअरमन अरुण पवार, महादेवराव जाधव सर, ज्ञानेश्वर जाधव, नवनाथ जाधव, विजय जाधव, सौरभ जाधव, सुरेश जाधव, रमेश माने, नारायण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व हितासाठी सदैव अविरतपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन चेअरमन शशांकभैया जाधव पाटील यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleA fabulous Eastern side https://top10ten.co.uk/northern-ireland/county-antrim/1058-4-slemish-mountain.html Marine Australia Road trip Routine
Next articleआ. प्रणिती शिंदे यांच्या विनंतीवरून नाना पटोले यांनी दिले स्वतःचे हेलिकॉप्टर, स्वतः रेल्वेने मुंबईकडे रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here