शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा नातेपुते येथे बॅनर जाळून निषेध

कट्टर शिवसैनिक माळशिरस तालुका उपप्रमुख अमोल उराडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

नातेपुते ( बारामती झटका )

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, लोकनेते दत्ताआप्पा वाघमारे यांच्या विचाराने प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यात शिवसेनेचे झंजावात असणारे धडाडीचे नेतृत्व तालुका उपप्रमुख अमोल उराडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा बॅनर जाळून निषेध करण्यात आला. यावेळी नातेपुते पंचक्रोशीसह शहरातील शिवसैनिकांचा स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभाग होता.

यामध्ये तालुका उपप्रमुख अमोल बोराडे, निजाम काझी, समीर शेख, रियाज काझी, सतीश सपकाळ, संदीप लांडगे, विजय रुपनवर, शिवम लांडगे, सोमनाथ काळे, शितलकुमार कोल्हाळे, नवनाथ राऊत, शेखर लांडगे, रुपेश ढगे, जगन्नाथ लांडगे, अमित भरते, सुशांत इंगोले, विनायक कोथमिरे, सनी गवळी, सचिन करे, विठ्ठल जाधव, हर्षवर्धन खंडागळे, धनंजय राऊत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंडखोर आमदारांच्या बॅनरला चप्पल व बुटाने मारून बॅनर जाळण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार करून शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत राहण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला. उद्धवजी ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद, बंडखोर आमदार मुर्दाबाद अशा घोषणा देऊन परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमळोली येथे जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
Next articleमाळशिरस शहरात चिल – इन कॅफेचा उद्घाटन समारंभ थाटात व उत्साहात संपन्न होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here