शिवामृत दुध ऊत्पादक सहकारी संघाची निवडणुक प्रक्रीया सुरु उमेदवारी अर्ज दाखल.

शिवामृत दूध संघात मेडद, विजयवाडी, मांडवे, उंबरे वेळापूर, जाधववाडी, देशमुखवाडी, लोणंद, कण्हेर, बाभुळगाव, फोंडशिरस, येळीव अशा गावातील तरुणांना संधी मिळालेली आहे.

अकलूज ( बारामती झटका)

शिवामृत दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित विझोरी या संघाची निवडणुक प्रक्रीया सुरु झाली असून सोमवारी १२ नामनिर्देशन पञ दाखल करण्यात आले आहेत. या निवडणुकीत नव्या १४ तरुण चेह-यांना संधी देण्यात आल्याची माहीती धैर्यशील मोहीते पाटील यांनी दिली.

सन १९७६ साली स्थापना झालेल्या शिवामृत दुध संघाची ही १५ वी पंचवार्षिक निवडणुक आहे. या संस्थेच्या ११२ सभासद संस्था असून निवडणुक प्रक्रीयेद्वारे २१ संचालकांची निवड करण्यात येणार आहे.

प्रतिनिधी निवडणुक निर्णय अधिकारी आर. जी. पाटील यांनी आज इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले. त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार दि. ८ जुलै ते दि. १४ जुलै अर्ज दाखल करणे. १५ जुलै रोजी छाननी, १८ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेणे व १४ ऑगस्ट रोजी मतदान आणि निकाल अशी निवडणुक प्रक्रीया आहे. सदर २१ संचालकांमध्ये १६ सर्वसाधारण, २ राखीव महीला, १ ओबीसी, १ अनुसुचित जाती, १ इतर मागास प्रवर्ग व १ भटक्या जाती याकरीता निवडणुक होणार आहे.

भास्कर लक्ष्मण तुपे (मेडद), ञिंबक ज्ञानदेव इंगळे (विजयवाडी), शरद बापू साळुंखे (मांडवे), अरुण भगवान थिटे (उंबरे वेळापुर), जगन्नाथ यशवंत जाधव (जाधववाडी), बाळासाहेब सिताराम देशमुख (देशमुखवाडी), सुभाष मारुती शिंदे (लोणंद), पोपट पांडूरंग बर्वे (कन्हेर), बाळासाहेब रावसाहेब पराडे (बाभुळगाव), अरविंद आण्णा भोसले (मांडवे), संजय कोंडीबा गोरे (फोंडशिरस), माधुरी रणजित फडतरे (येळीव) यांनी नामनिर्देशन पञ दाखल केली आहेत.

जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना आपल्या नव्या कल्पना संस्थेच्या उत्कर्षासाठी राबवता याव्यात. त्यामुळे जेष्ठ नेते विजयदादा, आ. रणजितसिंह मोहीते पाटील यांच्या विचाराने तरुणांना संधी देत असल्याची माहीती धैर्यशील मोहीते पाटील यांनी दिली. सातत्याने प्रगतीपथावर असलेल्या शिवामृत संस्थेची अनेक नामांकित उत्पादने आज महाराष्ट्रभर ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार…
Next articleकारूंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here