शिवामृत दुध संस्थेच्या मोहिते पाटील गटाच्या विजयाच्या घोषणेची औपचारीकता बाकी…

तरुणांना आपल्या नव्या कल्पना संस्थेच्या उत्कर्षासाठी राबविता याव्यात यासाठी तरुणांना संधी – धैर्यशील मोहिते पाटील

अकलूज (बारामती झटका)

विहीत मुदतीत विरोधकांकडून एकही नामनिर्देशन पञ दाखल न झाल्यामुळे शिवामृत सहकारी दुध उत्पादक संघ विजयनगर विझोरी या संस्थेत मोहीते पाटील गटाच्या विजयाच्या घोषणेची फक्त औपचारीकताच बाकी उरली आहे.

जेष्ठ नेते विजयसिंह मोहीते पाटील, राजसिंह मोहीते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहीते पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवामृत दुध संघ स्थापनेपासुन प्रगतिपथावर आहे. धैर्यशील मोहीते पाटील यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात संस्थेने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. दुधाला दराबरोबरच उप पदार्थांच्या उत्पादन आणी विक्रीवर संस्थेने भर दिला. त्यामुळे संस्था सातत्याने फायद्यात राहीली व सभासदांचा, दुध उत्पादकांचा संस्थेवर विश्वास दृढ राहीला. या सर्व जमेच्या बाजुंमुळेच या निडणुकीत विरोधकही विरोधापासून दुर राहीले.

दि. १४ जुलै ही नामनिर्देशन पञ दाखल करण्याची शेवटची तारीख होती. दुपारी ३ वाजेपर्यंत विरोधकांकडून एकही नमनिर्देशन पञ दाखल करण्यात आले नाही. दि. ११ रोजी मोहीते पाटील गटाकडून १२ व आज दि. १४ रोजी ९ असे एकूण २१ नामानिर्देशन पञ दाखल करण्यात आले. यामध्ये दि. १४ रोजी धैर्यशील मोहीते पाटील, दत्ताञय भिलारे, सचिन वाघमोडे, सुरेश पिसे, विजय नरुटे, हनुमंत शिंदे, शारदा पिसे व दादासाहेब शिंगाडे या नऊ जणांनी नामनिर्देशन पञ दाखल केले.

अर्ज माघारी घेण्याची मुदत दि. १८ जुलै ते १ ऑगस्ट असल्यामुळे मोहीते पाटील गटाच्या बिनविरोध विजयाची घोषणा औपचारिकता बाकी आहे.

जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आ.र णजितसिंह मोहीते पाटील यांच्या विचाराने तरुणांना आपल्या नव्या कल्पना संस्थेच्या उत्कर्षासाठी राबवता याव्यात, यासाठी संघाच्या २१ पैकी तब्बल १५ जागेवर तरुण व नवोदित चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याची माहीती धैर्यशील मोहीते पाटील यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसत्ता असो अथवा नसो पक्ष वाढीचे काम सुरूच राहणार आहे : पै. अक्षयभैय्या भांड.
Next articleप्रेरणादायी बातमी : मल्लसम्राट व्यायाम शाळेच्या आठ मल्लांना सुवर्णपदक तर, एकाला रौप्य पदक, कुस्ती क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here