जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. शितलादेवी मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट.
अकलूज ( बारामती झटका )
अखंड हिंन्दुस्तानचे आराद्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिव भीम प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले असून ७८५ नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सदरचा उपक्रम अकलूज येथील प्रतापसिंह चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात अकलूजमध्ये साजरी करण्यात आली आहे. विजय चौक, गांधी चौक, महर्षी चौक, सदुभाऊ चौक, प्रतापसिंह चौक, धवल चौक यासह अकलूजच्या पंचक्रोशीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विविध मंडळांनी आकर्षक अशा सजावटी केल्या होत्या, तर काही मंडळांनी अत्यंत सुंदर देखावे सादर केले होते. तर काही मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवत जयंती साजरी केली. सकल शिव भिम प्रतिष्ठान यांनी लोक सहकार्यातुन जयंतीचे औचित्य साधुन अकलुजमधील गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये ७८५ नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेत सकल शिव भीम प्रतिष्ठाचे कौतुक केले.

यावेळी सकल शिव भीम प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हणाले की, या वर्षी १००१ अन्नदानाचे नियोजन आखण्यात आले होते. परंतु ७८५ नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेत प्रतिसाद दिला आहे. पुढील वर्षी शिव जयंती निमित्त याच्याहुन अधिक चांगल्या प्रकारे उपक्रम राबिवण्यात येतील असे म्हणाले. हा उपक्रम उत्तमरित्या राबिवण्याचे कार्य ओंकार कांबळे, सागर नागटिळक, आशुभाऊ ढवळे, आकाश जाधव, अमोल मगर, निल तिकोटे, वैभव एकतपुरे यांनी पार पाडले असून अन्नपुर्णा लग्नकार्यालयाचे मालक मोहनभैय्या तिकोटे यांचे सहकार्य मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
