शुद्ध बिया पोटी फळे रसाळ गोमटी, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी – सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

दि. २५ मे नंतर रोहीणी नक्षत्राचा पाऊस सुरु होतो. तसेच सर्व हवामान तज्ञांनी या वर्षी पाऊस वेळेत व समाधानकारक वर्तविला आहे. बऱ्यांपैकी शेतकरी बांधवाची लगबगीने पूर्वमशागत कामे पूर्ण केली असुन खरीप मका, तुर, सुर्यफुल, बाजरी, सोयाबीन व इतर भाजीपाला पीकांसाठी जमिन तयार करून पेरणीची वाट बघत आहेत.

शुद्ध बियापोटी फळे रसाळ गोमटी या उक्ती प्रमाणे बियाणे शुद्ध असेल तर, अपेक्षीत उत्पादन मिळू शकते. अन्यथा खराब बियाणांमुळे हंगाम वाया जातो व आर्थिक हानी होते. म्हणून बियाणे खरेदी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

१ – कृषि विभाग, विद्यापीठ शात्रज्ञ यांच्या सल्ल्याने कृषि विद्यापीठाने शिफारस विभाग निहाय अधिसुचीत पीक व वाण यांची निवड करावी. २ – शेतकरी बांधवांनी कृषि विभाग, शेतकरी, कृषि विज्ञान केंद्र, संशोधन संस्था व पूर्व हंगाम शेतकरी यांच्याशी चर्चा करून वाण निवड करावी. ३ – बियाणे अधिकृत मान्यता पात्र कंपनी व विक्रेते यांचेकडून सिलबंद पिशवी व टॅग आणि टॅगवरील माहिती तपासून खरेदी करावे. ४ – पीक पैदासकारनी विकसित केलेले शुद्ध चांगल्या स्थितीतील बियाणे – पिवळ्या टॅगसह मुलभुत बियाणे पांढऱ्या टॅगसह पायाभूत बियाणे, निळ्या टॅगसह प्रमाणित बियाणे व हिरव्या टॅगसह सत्यप्रत बियाणे खरेदी करावे. ५ – अधिसुचीत जातीच्या बियाणे विक्री करताना बियाणे प्रकारानुसार त्या रंगाचा मुल्य दर्शविणारा टॅग प्रमाणित व अधिकारी स्वाक्षरीत असल्याची खात्री करून खरेदी करावे. ६ – किड व रोग प्रतिबंधक प्रक्रिया यांचा उल्लेख व पक्षी, प्राणी, मनुष्य खाणेस अयोग्य असा वैधानिक ईशारा असलेले बियाणे खरेदी करावे. ७ – बियाणे खरेदी करताना विक्रेतेकडून ज्यांचे शेतावर लागवड करावयाची आहे त्यांचे नाव, पीकाचे नाव, वाण, लॉट क्रमांक, वैधता दिनांक, पॅकिग साईज, मुल्य, जी.एस.टी, दिनांक परवाना क्रमांक सह विक्रेते व ग्राहक सहीचे पक्के बील घ्यावे. कारण भविष्यातील तक्रार निवारण व साह्य कार्यवाही आणि दाद मागण्यासाठी महत्वाचा अभिलेख आहे. ८ – बियाणे वैधता तपासणी दिनांकापासून ९ महिने व नुतणीकरण बियाणे वैधता ६ महिने असते, हे बियाणे वैधतासाठी तपासून घ्यावे. ९ – पेरणी शक्यतो पीक त्याचे वाण यांचे विद्यापीठ शिफारस नुसार हंगाम पेरणी कालावधी जमिन प्रकार खोली व योग्य ओलावा असेल वर शिफारस केलेल्या पद्धतीने केल्यास अपेक्षित उत्पन्न व लेब क्लेम साध्य होतो याची कटाक्षाने अमलबजावणी करावी. १० – पेरणी वेळी पिशवी खालच्या बाजूने फोडून चिमुटभर बियाणे व टॅग व्यवस्थित ठेवून रासायनिक बीजप्रक्रिया बियाणेला जैविक बीज प्रक्रिया करून सावलीत वाळवून करावी. ११ – उत्पादक कंपनी लेबल क्लेमसाठी पेरणी तारीख उगवण टक्केवारी वाढीच्या अवस्थेतील नोंदी किड व रोग प्रार्दुभाव व उत्पादकता यांच्या नोंदी ठेवाव्यात. १२ – शक्यतो एकाच लॉटचे बियाणे घ्यावे जर उपलब्ध नसेल तर वेगवेगळ्या लॉटचे बियाणे एकत्र करून पेरू नये लॉट नुसार प्लॉट व पेरणी करावी. १३ – बियाणे कंपनी पीक व वाण यांचे लेबल क्लेमनुसार उगवण टक्केवारी वाढीचे अवस्था गुणधर्म पीक वाढीच्या अवस्थेतील किड व रोग प्रार्दुभाव उत्पादकता यांच्यामध्ये फरक आल्यास व साध्य होत नसेल शेतकरी बंधूनी नावचा ७/१२, बियाणे खरेदी पावती व टॅग झेरॉक्स सह तक्रार अर्ज कृषि अधिकारी पं. समिती यांचेकडे करावा. १४ – बियाणे तक्रार निवारणसाठी तालुका कृषि अधिकारी अध्यक्ष पं. समिती कृषि अधिकारी, सचीव, कृषी अधिकारी तालुका, कृषि अधिकारी कार्यालय सहसचीव ज्या गावातील तक्रार आहे, त्या मंडळचे कृषि अधिकारी, सदस्य, जवळचे विद्यापीठ, संशोधन संस्था, के.व्ही.के.के. चे शात्रज्ञ सदस्य कंपनी प्रतिनिधी सदस्य यांचे कमीटीची प्रक्षेत्र स्तरावरील निरीक्षणे व तक्रार अर्जाची पडताळणी करून टिपणी व लेबल क्लेम साध्य होत नसेल तर शेतकर्यांचे झालेल्या नुकसान टक्केवारी आधारे नुकसान भरपाई देण्यास कंपनीस सुचीत करून दंड करण्यात येतो. १५ – पीक व जातीचा लेबल क्लेम साध्य होत नसेल तर बियाणे कायदा १९६६ कलम १० नुसार शेतकरी बांधव दाद मागू शकतात. १६ – तालुका स्तरीय समितीने नोंदविलेल्या निष्कर्षानुसार ठोठावलेला दंड, नुकसान भरपाई कंपनी व विक्रेते मान्य करत नसेल तर जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसान भरपाई मागता येते. १७ – शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत बियाणे अधिनियम १९६८ व बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अंतर्गत कायदयाने कारवाई करण्याची तरतुदीनुसार संधी शेतकरी बांधवांना घेता येते.

या संबंधी आधिक माहिती हंगाम पीक जमिनीनुसार विद्यापीठ शिफारस अधिसुचीत पीक वाण निवड व महिती मार्गदर्शन सल्ल्यासाठी नजीकचे कृषि विभाग कार्यालय व अधिकारी यांचेशी शेतकरी बांधवानी संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील १४३ विकास सेवा सोसायट्यांपैकी १०३ सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण
Next articleसंग्रामसिंह मोहिते पाटील विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रवीकाका घोरपडे, तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती कमल कदम यांची निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here