शेंडेवाडी तामशिदवाडी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांसाठी ३९ उमेदवार तिरंगी लढत.

माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पाटील, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, माजी चेअरमन हनुमंत पाटील यांचे तिन्ही पॅनल आमनेसामने.

श्री बाणलिंग शेतकरी विकास पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत मधुकरभाऊ पाटील गटाची कपबशी घराघरात तर छत्री आणि विमान हवेतच…

फोंडशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामधील सर्वात मोठी असणाऱ्या शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तामशिदवाडी पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांसाठी ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पाटील, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत पाटील यांचे तिन्ही पॅनल आमनेसामने उभे राहिलेले आहेत.

शेंडेवाडी तामशिदवाडी सोसायटीचे कार्यक्षेत्र मोठे आहे. सर्व व्यवहार फोंडशिरस येथून सुरू असतो. सोसायटीचे २८०० सभासद आहेत. त्यापैकी २६७६ सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. मतदान शनिवार दि. ३०/०४/२०२२ रोजी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळा फोंडशिरस येथे होणार आहे. येथील सहाय्यक निबंधक संस्था कार्यालयातील एस. व्ही. गोरे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव जालिंदर वाघमोडे सहकार्य करीत आहेत.

फोंडशिरस पंचक्रोशीमध्ये राजकीय, सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणारे, सर्वसामान्य जनतेला अडचणीत वेळोवेळी मदत करून सर्वसामान्य जनतेमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य, फोंडशिरस पंचक्रोशीतील जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ नेते मधुकर पाटील यांच्या श्री बाणलिंग शेतकरी विकास पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत मधुकर भाऊ पाटील गटाचे सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटामध्ये बोडरे उमाजी महादेव, मारकड आनंदा तुकाराम, मोटे बाबासो विठ्ठल, आदेश सोपान वाघमोडे, आनंदा ज्ञानदेव वाघमोडे, खंडू पांडुरंग वाघमोडे, रामदास संभाजी वाघमोडे, श्यामराव अर्जुन वाघमोडे, असे आठ उमेदवार उभे आहे. महिला राखीव प्रवर्ग गटात भाळे नंदा बापू, ताराबाई रामदास वाघमोडे, अशा दोन महिला उमेदवार उभ्या आहेत, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात सुनील भालचंद्र वाघमोडे उमेदवार उभे आहेत. इतर मागास प्रवर्ग गटात अनंत यशवंत शेंडे उमेदवार उभे आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग हरिदास अंकुश भोसले असे तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कपबशी चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. काल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिन्हाचे वाटप केल्यानंतर मधुकरभाऊ पाटील गटाचे कपबशी चिन्ह घराघरात पोहोचलेले आहे, तर विरोधी गटाचे छत्री आणि विमान अजून हवेतच आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतरुणांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता इतर व्यवसायाकडे वळण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
Next articleघुलेनगर येथे शिखर शिंगणापूर यात्रेसाठी जाणार्‍या भक्तांसाठी, फलटन धुळोबा भिवाई व पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी पाणपोईचे नियोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here