राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत श्री बाणलिंग शेतकरी विकास पॅनलचे हिंद केसरी मधुकरभाऊ पाटील गटाचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा दणदणीत विजय.
फोंडशिरस ( बारामती झटका )
शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तामशिदवाडी फोंडशिरस या संस्थेच्या चेअरमनपदी खंडूआप्पा पांडुरंग वाघमोडे तर, व्हा. चेअरमनपदी श्री. आनंदा तुकाराम मारकड यांचा दणदणीत विजय झालेला आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकरभाऊ पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत श्री बाणलिंग शेतकरी विकास पॅनल गटाचा झेंडा शेंडेवाडी सोसायटीवर दैदिप्यमान विजयाने फडकला आहे.
सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित केलेली होती. यावेळी संचालक श्री. खंडूआप्पा पांडुरंग वाघमोडे, श्री. उमाजी महादेव बोडरे, श्री. आनंदा तुकाराम मारकड, श्री. रामदास संभाजी वाघमोडे, श्री. बाबासो विठ्ठल मोटे, श्री. शामराव अर्जुन वाघमोडे, श्री. मल्हारी बाबु ढोबळे, श्री. दत्तात्रय भानुदास वाघमोडे, श्री. कैलास किसन गोरे, श्रीमती ताराबाई रामदास वाघमोडे, सौ. इंदुमती मारुती वाघमोडे असे १२ संचालक उपस्थित होते तर श्री. आदेश सोपान वाघमोडे अनुपस्थित होते.

चेअरमन पदासाठी खंडूआप्पा पांडुरंग वाघमोडे यांनी अर्ज भरलेला होता. त्यावर श्री. उमाजी महादेव बोडरे सूचक व श्री. शामराव अर्जुन वाघमोडे यांनी अनुमोदक म्हणून सही केलेली होती. त्यांच्या विरोधात इंदुमती मारुती वाघमोडे यांनी अर्ज भरलेला होता. त्यावर सूचक श्री. दत्तात्रय भानुदास वाघमोडे व अनुमोदक श्री. कैलास किसन गोरे यांनी सह्या केलेल्या होत्या. चेअरमन पदाच्या निवडीसाठी मतदान झालेले होते. श्री. वाघमोडे खंडू पांडुरंग यांना आठ मते मिळाली तर, सौ. वाघमोडे इंदुमती मारुती यांना चार मते मिळाली. ज्यादा मते पडल्याने श्री. वाघमोडे खंडूआप्पा पांडूरंग यांना चेअरमन घोषित करण्यात आले. त्यानंतर व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी श्री. आनंदा तुकाराम मारकड यांनी अर्ज दाखल केला, त्या अर्जावर सूचक श्री. बाबासो विठ्ठल मोटे अनुमोदक श्री.आनंदा ज्ञानदेव वाघमोडे यांनी सह्या केल्या. तर विरोधी श्री. मल्हारी बापू ढोबळे यांनी अर्ज दाखल केला, त्यावर कैलास किसन गोरे यांनी सूचक तर श्री. दत्तात्रेय भानुदास वाघमोडे यांनी अनुमोदक म्हणून सही केली. व्हाईस चेअरमन पदासाठी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये श्री. आनंदा तुकाराम मारकड यांना ८ मते तर मल्हारी बापू ढोबळे यांना ४ मते मिळाली. त्यामुळे श्री. आनंदा तुकाराम मारकड यांना व्हाईस चेअरमन घोषित करण्यात आले.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तामशिदवाडी फोंडशिरस सर्वात मोठी व प्रतिष्ठेची संस्था आहे. या संस्थेवर माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य निवडणुकीत हिंदकेसरी ठरलेले मधुकर भाऊ पाटील यांनी राष्ट्रवादी गटाचा झेंडा फडकवलेला आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड होताच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विरोधकांचा निवडणुकीत सभासदांनी धुरळा उडवून दिलेला होता. चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीत संचालक मंडळांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. वाजत गाजत ग्राम दैवत आशीर्वाद घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री बाणलिंग शेतकरी विकास पॅनलचे पॅनल प्रमुख मधुकरभाऊ पाटील नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सर्व कार्यकर्ते, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng