शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत तीन पॅनल आमनेसामने तरीसुद्धा एकच पॅनल सत्येत येण्याची शक्यता…
फोंडशिरस ( बारामती झटका )
शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित तामशिदवाडी या सोसायटीच्या निवडणुकीत 2676 मतदारांपैकी 1572 मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची टक्केवारी 58.74 झालेली आहे. निवडणुकीत तीन पॅनल आमने-सामने आहेत मात्र, एकच पॅनल सत्तेत येण्याची शक्यता मतदारांमधून बोलली जात आहे.
सर्वसाधारण कर्जदार गटात बोडरे उमाजी महादेव, बोराटे मुक्ताजी महादेव, चव्हाण बापू विठोबा, कदम हनुमंत शंकर, कदम केशव बाळू, कदम विष्णू साहेबराव, कदम मारुती एकनाथ, कोडलकर संजय नारायण, मारकड आनंदा तुकाराम, मारकड नामदेव तुकाराम, मारकड सदाशिव संभू, मोटे बाबासो विठ्ठल, नरूटे पोपट दौला, शेंडे भानुदास अण्णा, वाघमोडे आदेश सोपान, वाघमोडे आनंदा ज्ञानदेव, वाघमोडे भिमराव नारायण, वाघमोडे खंडू पांडुरंग, वाघमोडे महादेव नाना, वाघमोडे रामदास संभाजी, वाघमोडे शामराव अर्जुन, वाघमोडे सुभाष एकनाथ, वाघमोडे सुखदेव महादेव, वाघमोडे तानाजी पांडुरंग असे 24 उमेदवार उभी आहेत.

महिला प्रतिनिधी गटात भाळे नंदाबाई बापू, धायगुडे यशोदा पोपट, सरगर पाटील वनिता, दत्तात्रय वाघमोडे इंदुमती, मारुती वाघमोडे ताराबाई, रामदास वाघमोडे रुक्मिणी, अंकुश अशा सहा महिला उमेदवार आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात भोसले हरिदास अंकुश, भोसले नाना सदाशिव, ढोबळे मल्हारी बापू असे तीन उमेदवार उभे आहेत.
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात वाघमोडे आनंदराव आबाजी, वाघमोडे दत्तात्रेय भानुदास, वाघमोडे सुनील भालचंद्र, असे तीन उमेदवार उभे आहेत. इतर मागास प्रवर्ग गटात गोरे कैलास किसन गोरे शिवाजी संपत शेंडे आनंता यशवंत असे तीन उमेदवार उभे आहेत. प्रत्येक गटाचे 13 उमेदवार असे एकूण 39 उमेदवार उभे आहेत. मतदान शांततेत पार पडलेले आहे. अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी यशस्वी कोरे यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य संस्थेचे सचिव जालिंदर वाघमोडे यांनी केले. नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. सध्या मतदान मोजणीची सुरुवात झालेली आहे. निकाल ऐकण्यासाठी फोंडशिरस पंचक्रोशीतील नागरिकांनी चौकात चौकात गर्दी केलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng