शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागांसाठी 61 उमेदवारी अर्ज दाखल.

मधुकर पाटील, भानुदास पाटील, हनुमंत पाटील यांच्यात तिरंगी लढत लागण्याची शक्यता.

फोंडशिरस ( बारामती झटका )

शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित तामशिदवाडी ता. माळशिरस या सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असून 13 जागांसाठी 61 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर वाघमोडे पाटील, यांचे 21 उमेदवार सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुदास वाघमोडे पाटील, यांचे 20 उमेदवार, सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत वाघमोडे पाटील, यांचे 18 उमेदवार व अपक्ष 2 उमेदवार असे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तिरंगी लढत लागण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेली शेंडेवाडी फोंडशिरस विविध कार्यकारी सेवा सोसायटी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सर्वात मोठी समजली जाते. पूर्वीच्या काळी 12 गावांचा कारभार या सोसायटीमधून सुरू होता. कालांतराने अनेक गावांमधून सोसायट्या झालेल्या आहेत. शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये तीन हजाराच्या आसपास सभासद आहेत. चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असते. थकित असलेले सभासद वगळून 2673 सभासद मतदानाला पात्र आहेत.

सेवा सोसायटी कायम 100% वसुली मध्ये असून 10 ते 15 टक्के डिव्हीडंट वाटप केला जातो. शेंडेवाडी सोसायटीला नाव आहे. सर्व व्यवहार फोंडशिरसचे नेते मंडळी बघत असतात. राष्ट्रवादीचे मधुकर पाटील व भानुदास पाटील यांचे दोन पॅनल आहेत तर, भाजपचे हनुमंत पाटील यांचा एक पॅनल आहे. तिरंगी लढतींमध्ये दोन अपक्ष सुद्धा आपले नशीब आजमावणार आहेत.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात वाघमोडे विजय सदाशिव, खुळे मारुती एकनाथ, शेंडे भानुदास अण्णा, वाघमोडे सुखदेव महादेव, कदम विष्णू साहेबराव, मरकड किसन आप्पा, मरकड नामदेव तुकाराम, चव्हाण बापू विठोबा, कदम केशव बाळू, वाघमोडे महादेव नाना , मारकड बाळू एकनाथ, काळे हनुमंत नामदेव, बोराटे मुक्ताजी महादेव, वाघमोडे तानाजी पांडुरंग, वाघमोडे संजय हरिबा, कोडलकर संजय नारायण, वाघमोडे भिमराव नारायण, नरूटे पोपट दौला, कदम हनुमंत शंकर, कोडलकर लक्ष्मण नारायण, वाघमोडे मल्हारी रामू, वाघमोडे सुभाष एकनाथ, बोडरे उमाजी महादेव, वाघमोडे आदेश सोपान, वाघमोडे आनंदा ज्ञानदेव, वाघमोडे चंद्रकांत रामदास, वाघमोडे हनुमंत आप्पाजी ( संभू), मारकड आनंदा तुकाराम, मोटे बाबासो विठ्ठल, वाघमोडे अंकुश विठ्ठल, वाघमोडे मिलिंद भानुदास, वाघमोडे रामदास संभाजी, वाघमोडे शामराव अर्जुन, वाघमोडे आनंता विठ्ठल, मोटे रामदास अण्णा, वाघमोडे अर्जुन बाळू, वाघमोडे खंडू पांडुरंग, मरकड सदाशिव संभू, असे उमेदवार आठ जागेसाठी रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधी गटात वाघमोडे रुक्मिणी अंकुश, वाघमोडे इंदुमती मारुती, धायगुडे यशोदा पोपट, सरगर पाटील वनिता दत्तात्रय, वाघमोडे ताराबाई रामदास, भाळे नंदाबाई बापू, वाघमोडे सुमन संभाजी अशा महिला उमेदवार दोन जागेसाठी निवडणूक रिंगणात आहेत. इतर मागास प्रवर्ग गटात गोरे कैलास किसन, गोरे शिवाजी संपत, शेंडे अनंता यशवंत, असे तीन उमेदवार एका जागेसाठी उभे आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात वाघमोडे दत्तात्रेय भानुदास, मारकड नामदेव तुकाराम, वाघमोडे हनुमंत लक्ष्मण, वाघमोडे भाऊसो पोपट, वाघमोडे भिमराव नारायण, वाघमोडे आनंदराव आबाजी असे उमेदवार एका जागेसाठी उभे आहे. अनुसूचित जाती जमाती गटात ढोबळे मल्हारी बापू, रणदिवे शांतीलाल बाबू, भोसले नाना सदाशिव, भोसले हरिदास अंकुश असे उमेदवार एका जागेसाठी उभे आहेत.

शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही. कोरे काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव जालिंदर वाघमोडे हे करीत आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जापैकी 60 अर्ज वैध झालेले आहेत. एका उमेदवाराची तांत्रिक अडचण होती तोही अर्ज वैध होईल. उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचे पंधरा दिवसाच्यावर अवधी आहे. तोपर्यंत रुसवे-फुगवे मनोमिलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू होतील. सध्या तरी सर्व उमेदवार फोंडशिरस मधील रहिवासी असल्याने गावांमध्ये कोणत्याही चौकात अथवा रस्त्याने नजर फिरवल्यास सोसायटीचा उमेदवार दिसत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलाखेवाडी येथील भवानी मातेच्या पावनभूमीमध्ये देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा.
Next articleपांडुरंग सहकारी साखर कारखाना स्थळावर जपान येथील झोमलींग ऊस तोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक व उद्घाटन समारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here