शेजबाभु़ळगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नाना उगले तर उपाध्यक्षपदी काकासाहेब फडतरे बिनविरोध

अंकोली (बारामती झटका)

मोहोळ तालुक्यातील मौजे शेजबाभुळगावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब तानाजी उगले तर उपाध्यक्षपदी काकासाहेब गुलाब फडतरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.

शेजबाभुळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत ही बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती दिपक गवळी या होत्या. यावेळी या समितीच्या अध्यक्षपदासाठी नानासाहेब उगले व उपाध्यक्षपदासाठी काकासाहेब फडतरे या दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच माधवराव उर्फ काकासाहेब पाटील, माजी सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच नागराज पाटील, दिपक गवळी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप फडतरे, विजयकुमार घोंगडे, सुलतान शेख, आवडन माळी, मंगल रणदिवे तसेच सुलभाताई गायकवाड, बापूसाहेब भंडारे, मधुकर फडतरे, दयानंद रणदिवे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकोल्यात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
Next articleमराठ्यांचे खरे हक्काचे आरक्षण पन्नास टक्केच्या आत ओबीसी मध्येच – योगेश केदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here