मागील चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. पण आज रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली.
बुलढाणा ( बारामती झटका )
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. आज चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे संतप्त झालेल्या समर्थक आणि शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी पेटवून दिली. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रवीकांत तुपकर यांनी आपल्या राहत्या घरीच आंदोलन पुकारले आहे. मागील 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहे. पण आज तुपकरांची प्रकृती खालावली. तुपकरांची प्रकृती खालवल्याने शेतकरी व कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी बुलडाणा तहसीलदार यांची गाडी पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुपकर आपल्या मागण्यावर ठाम आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रवीकांत तुपकरांची प्रकृती खालावली असतांना त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतल्या जात नाही त्यामुळे सरकारला किती बळी पाहिजेत म्हणत स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत अन्नाचा कण घेणार नाही या भूमिकेवर तुपकर ठाम असतांना एका पदाधिकाऱ्याने चक्क अन्न त्याग आंदोलनस्थळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये तुफान राडा झाला. पोलिसांनी लगेच आत्मदहन करणाऱ्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
या आहे मागण्य़ा?
बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अचानक एकत्र येत सडलेले सोयाबीन जाळून आंदोलन केलं. सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असून अतिवृष्टीग्रस्तांना 50 हजार रुपये मदत देण्यात यावी, सोयाबीनचा प्रति क्वि. दर 8 हजार रुपये व कापसाचा प्रति क्वि. दर 12 हजार रु.स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, ओला दुष्काळ जाहीर करा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng