शेतकऱ्यांची जुलमी महावसुली बंद करून सरकार व महावितरण ताळ्यावर आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन – आमदार राम सातपुते.

माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव महामोर्चामध्ये सामील होऊन महाविकास आघाडी सरकार व महावितरणच्या जुलमी वसुलीचा निषेध करणार.

माळशिरस ( बारामती झटका )

महावितरणकडून शेती पंपाची तोडणी मोहीम सुरू केलेली आहे ती तात्काळ बंद करावी, अवाजवी बिले रद्द करावीत, शेतकऱ्यांच्या पिकांची पर्वा न करता शेती पंपाची वीज तोडणी मोहीम राबवत डीपी सोडवले जात आहेत, त्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी जळत आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव गाई, म्हशी, शेळ्यामेंढ्या यांना पिण्याच्या पाण्याची लाईट नसल्याने अडचण भासत आहे. यासाठी शेतकऱ्यांची जुलमी महावसुली बंद करून सरकार व महावितरण ताळ्यावर आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन केलेले असून माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव महामोर्चामध्ये सामील होऊन महाविकास आघाडी सरकार व महावितरणच्या जुलमी वसुलीचा निषेध करणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सांगितले.कोरोना परिस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले होते. उद्योग व्यवसाय बंद होते, अशावेळी बळीराजा बांधावरती उभा होता. संपूर्ण अन्नधान्य, भाजीपाला जनतेला पुरविण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. कोरोना परिस्थिती, अवकाळी पाऊस, वारा, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कोलमडून गेलेला आहे. कितीतरी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान निसर्गाने केलेले आहे. निसर्गाच्या अवकृपेतून काही शेतकरी बांधवांची पिके वाचलेली आहेत. आणि हातातोंडाला आलेली पिके महावितरणकडून शेतीपंपाची वीज तोडणी सुरू असल्याने रानातील पिके पाणी असूनसुद्धा करपून चाललेली आहेत. जनावरांना पाणी असून सुद्धा पाणी पाजता येईना, अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देण्याऐवजी शेतकऱ्यांचे हाल सरकारने सुरू केले आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे. सरकारला व महावितरण कंपनीला ताळ्यावर आणण्याकरता महामोर्चाचे आयोजन केलेले आहे. वीज तोडणी मोहीम तात्काळ बंद करून अवाजवी बिले रद्द करावी, सर्व डीपी पूर्ववत करावेत, या मागणीसाठी गुरुवार दि. 25/11/2021 रोजी सकाळी 10.30 वाजता माळशिरस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौक तहसील कार्यालयावर येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी तालुक्यातील शेतकरी, नागरिक भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी बारामती झटकाशी बोलताना केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रादेशिक सहसंचालक साखर यांचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना लेखी देण्याचे आदेश.
Next articleगुणवडी येथे ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here