शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या अचानक माळशिरस तालुक्याच्या दौऱ्याकडे अनेकांच्या लागल्या नजरा….

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना शेतकऱ्यांसाठी धडपड करणारे माजी खासदार राजू शेट्टी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

माळशिरस ( बारामती झटका)

शेतकऱ्यांचे दैवत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात ओळख असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी मंगळवार दि. २१ फेब्रुवारी रोजी अचानक माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने अनेकांच्या नजरा दौऱ्याकडे लागलेल्या आहेत. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना शेतकऱ्यांसाठी धडपड करणारे माजी खासदार राजू शेट्टी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन, गट तट बाजूला ठेवून, सर्वसामान्य जनता व शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी राजकीय मांडव तयार करण्याकरता कार्यकर्त्यांचे मनोबल व संघटन वाढविण्याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेबांचे महाराष्ट्रात दौरे सुरू आहेत. विशेष करून सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुका राजू शेट्टी साहेब यांचे विशेष लक्ष आहे. उद्या अचानक होणाऱ्या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे..

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत – युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज
Next articleसर्वोच्च न्यायालयाने डोळस यांची उत्तमराव जानकर यांच्या विरोधातील स्पेशल लिव पिटीशन फेटाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here