तक्रारीची दखल नाही घेतली तर, तीव्र स्वरूपात आंदोलन करणार – जिल्हाध्यक्ष सुमित भोसले
श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. बँकेतील मॅनेजर एस. जाफर अहमद, शिपाई हनुमंत खरात आणि इतर चार लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरणे करून कोट्यावधी रुपयांची अफरातफर करून फसवणूक केली आहे. सदर फसवणुकीबाबतचे तक्रारी निवेदन देखील त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग यांना दिले आहे.


श्रीपुर शाखेत 2014 मध्ये झालेली कर्ज प्रकरणे 2022 मध्ये शेतकऱ्यांना नोटीस आल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले असून आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तरी या भ्रष्टाचाराच्याबाबत विशेष अधिकारी नेमून या प्रकरणाचा योग्य तो तपास करून कायदेशीर कारवाई करून मॅनेजर शिपाई व अन्य चार लोकांवर गुन्हा दाखल करून शेतकरी व्यावसायिक व बेरोजगार यांना न्याय मिळावा अशी विनंती देखील या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
