मुंबई (बारामती झटका)
दि. 7 मार्चला राजू शेट्टी साहेब आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला मी स्वतः व आमचे जेष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना चुकीचे वाढीव वीज बिलं दिली आहे. महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांशी मुजोरीने वागतात. बिलं दुरुस्त करून देत नाहीत. ती बिलं दुरुस्त केल्याशिवाय शेतकरी बिल भरणार नाही ही ठाम व आक्रमक भूमिका राजू शेट्टी साहेबांनी या बैठकीत घेतली.

राजू शेट्टी साहेबांच्या आक्रमक भूमिके समोर नमतं घेऊन ऊर्जामंत्र्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वीजबिल दुरुस्तीचे शिबिर घेण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. त्याप्रमाणे 8 मार्चला शासन आदेश निघाला आहे. प्रत्येक अभियंता पर्यंत हा आदेश कालच पोहोचला आहे. सर्व शेतकरी बांधवांना आम्ही विनंती करतो की, आपले वीज बिल वाढीव आलेले असेल तर या शिबिरामध्ये ते दुरुस्त करून घ्यावे. महावितरणचे अधिकारी वीज बिल दुरुस्तीस टाळाटाळ करत असल्यास आपल्या परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. – संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng