वेळापूर (बारामती झटका)
‘शिक्षकांना गावाचा आधार… आणि गावाला गुणवंत शिक्षकांचा अभिमान…’ या उक्तीप्रमाणे शेरी नं १ जि. प. शाळेतील मुख्याध्यापक श्री. चाँदसाहेब नदाफ सर यांना नुकताच बामसेफतर्फे महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्याचप्रमाणे शाळेतील पदवीधर शिक्षक डाॅ. प्रेमनाथ रामदासी सर यांचा निबंध स्पर्धेत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल दोन्ही गुणवंत शिक्षकांचा शेरी नं १ ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने व सामूहीक सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. माधवराव माने देशमुख, श्री. अमरभाऊ माने देशमुख, श्री. प्रभाकर माने देशमुख, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सचिन पवार, श्री. संदीप माने देशमुख, श्री. मिलिंद माने देशमुख, श्री. अमोल माने देशमुख, श्री. विराज घार्गे, श्री. हिम्मतराव माने देशमुख, श्री. गणेश पताळे, श्री. कल्याण माने देशमुख, श्री. विक्रमसिंह माने देशमुख, श्री. देवानंद नवगन, श्री. अंबादास ढेरे, श्री. तुकाराम खुडे, श्री. नामदेव खुडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेळापूर येथील तुळशी चहा व स्नॅक्स सेंटर यांचे वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. त्याचबरोबर शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. प्रदीप कोरेकर सर व श्री. पांडुरंग वाघ सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेच्या उत्तुंग प्रगतीबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पालक श्री. मिलिंद माने देशमुख व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी परिसरातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng