पिएसआय, आरटीओ व एचएससी परिक्षेत केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान संपन्न
तरंगफळ ( बारामती झटका )
तरंगफळ ता. माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संस्थेचा विद्यार्थी नाथ्याबा घमाजी बोडरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड, मोटेवाडी माळशिरस येथील हनुमंत लक्ष्मण कोळेकर यांची आरटीओ पदी निवड व एचएससी परिक्षेत 92.60% गुण मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी तरंगफळचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे, माजी सरपंच भानुदासदादा तरंगे, ज्येष्ठ नेते ॲड. शांतीलाल बापू तरंगे, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर, उपसरपंच अवीकाका तरंगे, भानुदास काळे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर हनुमंत तरंगे, नवनाथ नरूटे, संस्थेचे प्राचार्य संतोषकुमार शेंडगे आदी मान्यवरांसह संस्थेचे शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थीनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng