श्रीपुर अकलूज रस्त्याच्या ठेकेदाराने साईड पट्ट्या भरलेत का ? वाहनधारकांना घसरून पडण्यासाठी मुरमाची रांगोळी ?

अमित कन्स्ट्रक्शनच्या कामावर वाहनधारक त्रस्त, ठेकेदार मस्त, तर अधिकारी सुस्त अशी अवस्था…

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे लक्ष देण्याची जनतेची मागणी.

श्रीपुर ( बारामती झटका )

श्रीपुर अकलूज रहदारीच्या रस्त्यावर ठेकेदाराने साईट पट्ट्या भरलेल्या आहेत का ?, वाहनधारकांना घसरून पडण्यासाठी मुरमाची स्वागतासाठी रांगोळी काढली आहे ? असा वाहनधारकांना प्रश्न पडलेला आहे. रस्त्याचे ठेकेदार अमित कन्स्ट्रक्शन यांच्या कामावर वाहनधारक त्रस्त आहेत, ठेकेदार मस्त आहेत, तर अधिकारी सुस्त अशी अवस्था झालेली असल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे‌ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात स्थानिक नागरिक आहेत.

सोलापूर जिल्ह्याचे दत्तामामा भरणे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री पद आहे. त्यांची जबाबदारी आहे त्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांची मागणी आहे.श्रीपुर अकलूज रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अमित कन्स्ट्रक्शन नेवरे ता‌ माळशिरस यांनी 226.91 लक्ष रुपयाचे काम कार्यकारी अभियंता महाराष्ट्र रस्ते विकास संस्था सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन अर्थसाहित प्रकल्प योजनेतून सदरचा रस्ता 2019 -20 साली पूर्ण केलेला आहे‌ सदरच्या रस्त्यावर 13/9/2024 पर्यंत पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती आहे. यासाठी 14.62 लक्ष निधीची तरतूद आहे. असे असताना ठेकेदाराने मुरूमाने साईट पाट्या व्यवस्थित भरणे गरजेचे असताना साईट पट्ट्यावर मुरमाची रांगोळी काढून वाहनधारकांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा उद्देश असावा. कारण रस्त्यावर छोटे-मोठे अनेक अपघात घडले आहेत.

अनेक ठिकाणी रस्त्यावर सूचना फलकाच्या पाट्या लावलेल्या नाहीत. साईट पट्ट्यावर रस्ता खराब झालेला आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. देखभाल दुरुस्ती व्यवस्थित करणे ठेकेदाराची जबाबदारी आहे. अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम करून घेणे त्यांचीही जबाबदारी आहे. मात्र, टक्केवारी घेऊन अधिकारी सुस्त झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून अंदाज पत्रकाप्रमाणे व देखभाल दुरुस्तीच्या नेमाने रस्त्याचे काम करून घ्यावे. अन्यथा आंदोलन करण्याच्या पावित्र्यामध्ये स्थानिक नागरिक व वाहनधारक आहेत. अशी चर्चा श्रीपुर परिसरात रंगली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगुरसाळे ग्रामस्थांचे आत्मदहन प्रशासनाच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे.
Next articleमहाळुंग – श्रीपुर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणार – मौलाभाई पठाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here