श्रीपुर परिसरात राजरोसपणे ओपन क्लोज मटका व्यवसाय तेजीत.

मुडदा बसविला मटकवाल्याचा पोलीस खातं नुसतं पैसे खातय परिसरातील महिलांचा आक्रोश.


श्रीपुर ( बारामती झटका )

अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणार्‍या श्रीपुर आऊट पोस्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्रीपुर परिसरात राजरोसपणे ओपन क्लोज मटका व्यवसाय तेजीत सुरू आहे आहे श्रीपुर पोलिसांचे आर्थिक हितसंबंधांमुळे डोळेझाक होत आहे त्यामुळे श्रीपुर परिसरातील महिलांचा आक्रोश सुरू आहे. पोलीस खातं नुसतं पैसा खातय मटका वाल्याचा मुडदा बसण्याकरता वरिष्ठ अधिकारी आहेत का नाहीत असा सवाल संतप्त महिलांच्या मधून होत आहे.
श्रीपुर परिसराला पूर्व भागामध्ये वेगळे स्थान आहे या गावात श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना व ब्रीमा सागर डिसलरी कारखाना असल्यामुळे अनेक गावाचा नोकरी व व्यवसायानिमित्त दैनंदिन संबंध येत आहे अनेक गावाला जाण्या येण्याकरिता श्रीपुर वरून ये जा करावी लागते.

श्रीपुर परिसरात मटका व्यवसायिकांनी जाळे विणलेले आहे कोणत्याही रस्त्यावर हॉटेल च्या बाजुला टपरी मध्ये मटका घेण्याचे काम सुरू आहे स्थानिक पोलिसांना माहित नाही का त्यांना माहित आहे परंतु आर्थिक हितसंबंधांमुळे हात बरबटलेले आहे त्यामुळे कारवाई करता येत नाही त्यामुळे मटका व्यवसायिकांच्या राजरोस ओपन क्लोज मटका सुरू आहे सात तारखेला ब्रिमा सागर डिसलरी कारखान्याचा पगार झालेला आहे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उसाचे बिल शेतकरी सभासदांच्या नावे जमा झालेली आहे अशावेळी भोळ्या आशे पोटी अनेक बागायतदार कर्मचारी खुलेआम असणाऱ्या मुंबई कल्याण मटक्या कडे वळतात आणि महिनाभर केलेले कामाचे एकाच दिवसात त् मटक्यावर पैसे घालवत असतात अनेक तरुण सर्वसामान्य गोरगरीब जनता मटक्या मध्ये गुंतलेली आहे अनेकांचे संसार उध्वस्त होत चाललेले आहेत.

श्रीपुर परिसरातील मटका कायमचा बंद व्हावा आमचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचणे गरजेचे आहे मुलांचे शिक्षण मुलींची लग्न अशा अनेक अडचणी असताना नोकरदार व बागायतदार मटका व्यवसायामुळे कंगाल होऊ लागलेले आहेत त्यामुळे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी आपल्या भरारी पथकाच्या साह्याने मटका घेणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यापेक्षा मटका मालकावर कारवाई करावी तडीपार करावे कायमचा मटका श्रीपुर परिसरात बंद करावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभटक्या विमुक्त जाती जमाती च्या अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती मधील आरक्षण कायम मिळावे.
Next articleकर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी केला हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here