श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर पत्रकार संघाचे अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे प्रतिनिधी सुखदेव साठे व दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी विजयकुमार देशमुख यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संदिप लोणकर, प्रकाश केसकर, बी. टी. शिवशरण, महादेव जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कुलकर्णी साहेब यांनी सर्व पत्रकारांचे कारखान्याच्या वाटचालीत सकारात्मक बातम्या देऊन सहकार्य केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी दत्ता नाईकनवरे, राजू मुलाणी, संदिप लोणकर, विनायक बागडे, महादेव जाधव, विजयकुमार देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी चिफ केमिस्ट एम. आर. कुलकर्णी, चिफ अकौंटट काकडे, शेती अधिकारी कुमठेकर, संगणक इंजिनिअर तानाजी भोसले, सोमनाथ भालेकर आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng