श्रीपूर येथे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या किरण नवगिरेचा आज जंगी सत्कार…

श्रीपूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील मिरे गावची तसेच श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालयात शिक्षण घेतलेल्या व सध्या क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करून सोलापूर जिल्ह्याचे नाव रोशन केलेल्या किरण प्रभू नवगिरे हीचे आज दुपारी साडेबारा वाजता श्रीपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हलगी वाजवत फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले.

महाळुंग श्रीपूर नगरपंचायत वार्ड क्र. १६ मधील नगरसेविका नाजनीन मोहसीन पठाण व मोहसीन पठाण यांचेवतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी किरण नवगिरे हिची क्रिडा शिक्षीका करुणा धाईंजे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. या प्रसंगी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, नगराध्यक्षा पती अशोक चव्हाण, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, श्रीपाद देऊसकर, नारायण खटके, एम. के. भोसले गुरुजी, भालचंद्र शिंदे पाटील, महादेव आठवले, तेजस बाबर, विश्वजीत भालशंकर, गौतम आठवले, विकी लंगडे, लखन कारंडे, शैलेश साबळे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी किरण नवगिरे हीचे आईवडील यावेळी उपस्थित होते. त्यांचा सन्मान नगरसेवक सोमनाथ मुंडफणे व अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीपाद देऊसकर यांनी किरण नवगिरे हीच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक करून तीचा खेळ नैसर्गिक असल्याचे सांगितले. किरण नवगिरे हीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. किरण नवगिरे व तीच्या आईवडिलांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. किरण नवगिरे हीची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड व्हावी, अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसिंधुरत्न फाऊंडेशन प्रस्तुत “विधीलेख” या महिला दशावतार नाटकातील कलावंतांची सदिच्छा भेट
Next articleपोलीस पाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येणार, राज्य सरकारच्या शासन निर्णयावर शिक्कामोर्तब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here