श्रीपूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन विठ्ठल आलाईन्स शुगरचे चेअरमन माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित बबनराव शिंदे यांचा वाढदिवस आज श्रीपूर ता. माळशिरस येथील कोमल पेट्रोल पंपासमोर श्रीपूर-महाळुंग राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी शालेय विदयार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
रणजित बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांचा नागरी सत्कार सोहळा मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी महाळुंग, श्रीपूर, बोरगाव, नेवरे, मिरे, माळखांबी, संगम, जांबूड, कोंढरपट्टा परिसरातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. महाळुंग श्रीपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गटनेते व नगरसेवक राहुल अप्पा रेडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात नगरसेवक व गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील, राजेंद्र वाळेकर चेअरमन तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सदस्य मौला पठाण, रावसाहेब सावंत पाटील, नामदेव पाटील, विक्रमसिंह लाटे, शिवाजी रेडे पाटील, नगरसेवक नामदेव इंगळे, संचालक दादासाहेब लाटे, बापूराव रेडे पाटील, रत्नाकर झगडे, पोपट कदम, त्रिंबक वाळेकर, अमरसिंह पिसाळ देशमुख, विजय सोपान भोसले, रोहित नंदकुमार काळे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng