श्रीपुर (बारामती झटका)
छत्रपती शिवराय व अंगरक्षक वीर संभाजी करवर, जिवाजी महाले या जिगरबाज मावळ्यांच्या शौर्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने शिवप्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहास अभ्यासक किरण भांगे यांच्या संकल्पनेतून रोहित काळे व भीमराव भुसनर यांच्या संयोजनातून संभाजी करवर यांच्या तैलचित्राचे प्रकाशन व लोकार्पण करण्यात आले.
तसेच यावेळी कु. वैष्णवी थोरात (शिरवळ) यांचे अफजलखानाचा वध या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी संभाजी करवर यांचे वारसदार परमेश्वर करवर, राहुल रेडे पाटील, विक्रम लाठे, नाभिक महामंडळाचे देविदास काळे, मौला पठाण, नितीन वाघमारे, आण्णासाहेब भुसनर, मच्छिंद्र व्हरगर, बच्चन साठे, केशव लोखंडे, ह.भ.प. आण्णा महाराज भुसनर, रमेश करवर, उद्योजक विजय भुसनर, उद्योजक ऋषिकेश यमगर, सतीश करवर, महादेव बंडगर, बब्रुवान भुसनर (इतिहास अभ्यासक), सुर्यकांत खुळे, संजय हाटकर, शिवराम गायकवाड, राहुल सराटे, धनेश डांगे, हर्षवर्धन खंडागळे, विठ्ठल जाधव, महेश सपकाळ, शिवाजीराव घोडके यांसह असंख्य शिवप्रेमी, नाभिक व हटकर समाजबांधव उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवानेते रोहित काळे, हटकर समाज संघटनेचे संस्थापक भिमराव भुसनर, मयूर जाधव, बबलू काशीद, चांगदेव साळुंके, गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब काशीद सर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng