श्रीमंत खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणास माळशिरस तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा.

श्रीमंत खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा क्रांती मोर्चा व शिवभक्तांकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार – धनाजी साखळकर.

मुंबई ( बारामती झटका )

श्रीमंत खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षण व न्याय हक्कासाठी अनेक मागण्या घेऊन आझाद मैदान येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणास माळशिरस तालुका सकल मराठा समाज व क्रांती मोर्चा यांच्यावतीने सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाचे धनाजी साखळकर यांनी पाठिंबा देऊन छत्रपती यांच्याशी पुढील रणनितीसाठी सुसंवाद साधला.

शासनाने छत्रपती संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणाची दखल लवकरात लवकर घ्यावी. अन्यथा माळशिरस तालुका सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा व शिवभक्त यांचेकडून तहसील कार्यालय माळशिरस येथे भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी इशारा दिलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. रामदास देशमुख यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
Next articleस्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे – डॉ. प्रकाश पांढरमिसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here