श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालयाचे राहुरी विद्यापीठात उज्वल यश

पानीव (बारामती झटका)

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ३५ वा पदवीदान समारंभ पार पडला २०१६-२०१७ ते २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये कु. सोनाली साधू माने या विद्यार्थिनीने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून दोन सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. कु. सोनाली साधू माने हिला महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पदवीदान समारंभामध्ये दि.२८/१०/२०२१ रोजी राज्यपाल मा. श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. सदर विद्यार्थिनी हि व्दितीय बॅचची असून तिला हे यश मिळविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. टी. कोळेकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी हाके, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गोरे व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित झांबरे तसेच सर्व सहाय्यक प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सध्याच्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर श्रीराम कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आदेशानुसार श्रीराम कृषी महाविद्यालय, पानिव येथे उपस्थित राहून ऑनलाईन पदवीदान कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयातील ११० विद्यार्थी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाश पाटील, सचिव मा. सौ. श्री. श्रीलेखा पाटील, सहसचिव मा.श्री. करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. बी. बी. वणवे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरोहित पवार विचार मंचच्या प्रदेश सचिवपदी विनोद तार्डे यांची आ. पवार यांच्याहस्ते निवड
Next articleवेळापूरचे ग्रामदैवत अर्धनारीनटेश्वराचे दर्शन लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here