श्रीराम शिक्षण संस्था व इनरव्हील क्लबच्या वतीने किशोरवयीन मुलींना आरोग्याबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न

अकलूज (बारामती झटका)

श्रीराम शिक्षण संस्था व इनरव्हील क्लब अकलूज आयोजित किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व त्यावरील समस्या यावर मार्गदर्शन तसेच मुली व महिलांसाठी असलेले कायदा व निर्भया पथक याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रद्धा जवंजाळ यांनी मुलींमध्ये या वयात होणारे बदल व त्यासाठी आवश्यक असा पोषक आहार व व्यायाम याचे नियमावली असायला हवी. तसेच या वयोगटामध्ये रक्ताचे प्रमाण सुद्धा खूप कमी असते. त्यामुळे मुलींनी त्यांच्या आहारावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच किरकोळ काही समस्या होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा असे सांगितले.

तसेच डॉ. रेवती राणे यांनी मुलींना मासिक पाळीत होणाऱ्या सर्व समस्या तसेच यावेळी मुलींनी स्वतःची काळजी, स्वच्छता आणि आरोग्य जपायला हवे, त्यासाठी कसा पोषक आहार घ्यायला हवा कुठल्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टीचे बंधन ठेवायला हवे, या सर्व बारीक-सारीक बाबींवर मुलींना विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तसेच मुलींसाठी या वयातच कोणते लसीकरण महत्त्वाचे आहे की, जेणेकरून त्यांना विवाहानंतर काही प्रमाणावर काही आजारांच्या बाबतीत सुरक्षितता प्राप्त होते, त्याबद्दलही सांगितले.

यानंतर पीएसआय सौ. स्मिता कांबळे मॅडम अकलूज पोलीस स्टेशन यांनी मुलींना सक्षम कसे व्हावे आणि त्यासाठी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करून कशा पद्धतीमध्ये स्वतःमध्ये बदल करावेत, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच निर्भया पथकाविषयी मुलींना माहिती दिली व आश्वासन दिले की, कोणतीही अडचण आल्यास त्वरित सोडवली जाईल. पोस्को म्हणजे काय टच करणे, लैंगिक हावभाव करणे या बद्दल मॅडमने अतिशय छान पद्धतीने मुलींना कल्पना स्पष्ट केली. तसेच आरोग्य विभाग अकलूजकडून डॉ. शुभदा पोटे यांनी शासनाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेअंतर्गत मुलींनी आत्तापासूनच सुरक्षित माता होण्यासाठी स्वतःबद्दल कुठल्या काळजी घेतल्या पाहिजेत हे सांगितले.

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत इनरव्हील सेक्रेटरी डॉ. अर्चना गवळी, इनरव्हील आयएसओ सौ. अमोलीका जामदार या उपस्थित होत्या. तसेच श्रीराम संस्थेच्यावतीने सौ. श्रीलेखा पाटील व पायल पाटील उपस्थित होत्या. यांनी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर साहेबांचे आवाहन
Next articleRestaurant Reservation Chatbot Template

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here