श्री कमला भवानी ब्लड बँकेत रक्तदान शिबिरे घ्या, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन

करमाळा (बारामती झटका)

करमाळा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात श्री कमला भवानी ब्लड बँकेची झालेली उभारणी रुग्णांसाठी आधार केंद्र बनली असून ही रक्तपेढी मजबूत करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन करमाळ्यातील रक्ताची गरज करमाळ्यातच भागवावी, असे आवाहन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले यावेळी ब्लड बँकेचे संचालक दीपक पाटणे, स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक महेश चिवटे, ब्लड बँक समन्वयक व्हाईस चेअरमन गणेश चिवटे, व्यवस्थापक निलेश पाटील यांनी आ. कल्याणशेट्टी यांचे स्वागत केले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवानंद बागल, उपाध्यक्ष प्रशांत नेटके, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख नागेश काळे, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, वैद्यकीय सहाय्यक विनोद महानवर, नागेश शेंडगे, रोहित वायबसे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, भाजपचे किरण बोकन, जितेश कटारिया, सचिन चव्हाण, जयंत काळे, ठाणे अफसर जाधव, फोटोग्राफर कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी आ. कल्याणशेट्टी यांनी ब्लड बँकेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले की, रक्तदान हे जगात सर्वात श्रेष्ठ दान असून सर्व जाती-धर्माचे बंधने तोडून रक्त एकमेकाला देऊन एकमेकाचा प्राण वाचू शकतो. यासाठी आता करमाळ्यातील श्री कमला भवानी ब्लड बँक मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असून या भागात जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेऊन या ब्लड बँकेचा पाया मजबूत करावा, असे आवाहन केले.

आगामी काळात या ठिकाणी शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्याचे प्रश्न सोडवावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, या ब्लड बँकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे मोठे सहकार्य लाभले असून येणाऱ्या पंधरा दिवसात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article7 Information To never baton rouge auto shop Get the Professional Range
Next articleलाफाच्या वतीने वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानावर महाराष्ट्र पॅरावैद्यक अधिनियम २०११ नुसार कार्यवाही होण्याबाबतचे निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here