श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने शिरपेचात रोवला मानाचा तुरा – बी टी शिवशरण

श्रीपूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचे कर्तबगारी, अचुक नियोजन, वर्तमान स्थितीत बदलत्या धोरणानुसार अचुक वेळ नियोजन कसे करावे याचे भान, दुरदृष्टी, कल्पकता यामुळे त्यांनी सहकारी साखर कारखानदारीत आपल्या अधिकाराची मोहोर उमटवली आहे. कुलकर्णी साहेब यांच्या कार्यकालावधीत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला राज्यपातळीवरील तसेच देशपातळीवरील सर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे आशिया खंडातील सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी चालवलेला व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते सुरू झालेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांच्या कारखान्यात कार्यकारी संचालक नियुक्त करण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी कुलकर्णी साहेब यांना तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केले. ही बाब निश्चितच अभिमानाची कौतुकास्पद तर आहेच. परंतु, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखाना चालवताना जे आदर्श वाटचाल परंपरा शेतकरी, सभासद, कामगार, अधिकारी यांना जो सन्मान देऊन कारखाना राजकारण विरहीत भुमिका घेऊन चालवला आणि हा आदेश ही भावना कारखान्याचे वाटचालीत महत्वाची ठरली.

त्यामुळे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नावलौकिक विश्वास आदर्श सहकार क्षेत्रात आहे आणि हा परिपूर्ण भक्कम सक्षम कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचे अनुभव, ज्ञान लक्षात घेऊन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मंडळाने कार्यकारी संचालक नियुक्त मुलाखत घेण्यासाठी आमंत्रित करण, हे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ऐतिहासिक वाटचालीत गौरवास्पद आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफळपिक विमा उतरविणे काळाची गरज – सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी
Next articleडोंबिवलीच्या लोकसेवा समितीचे स्मशानभूमी स्वच्छता अभियान…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here