श्री बिरोबा यात्रेनिमित्त डे हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न…

गोरडवाडी (बारामती झटका)

गोरडवाडी ता. माळशिरस येथे श्री बिरोबा यात्रेनिमित्त आज दि. ०१-०४-२०२२ रोजी शिवशंभो क्रिकेट क्लब गोरडवाडी चषक २०२२ आयोजित भव्य डे हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बक्षीस दात्यांच्या हस्ते सकाळी १० वा. बिरोबा मंदिरा जवळ, गोरडवाडी ता. माळशिरस येथे करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय गोरड, सागर गोरड, किसन गोरड, भागवत कर्णवर, दिपक गोरड, आप्पा गोरड, शशिकांत कर्णवर, सचिन कर्णवर, सागर मिसाळ, महेश यमगर, माणिक कोकरे, संतोष गोरड, आण्णा गोरड, संजय कोळेकर, आण्णा वाघमोडे, लक्ष्मण बंडगर यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षीसे देखील आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस रू. १७००१/- कै. ज्ञानेश्वर (माऊली) गोरड यांच्या स्मरणार्थ सागर भानुदास गोरड यांच्या कडून देण्यात येणार आहे. तर व्दितीय बक्षीस रु. १५००१/- कै. सजाबाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ गोविंद कर्णवर पाटील व शिवशंभो इंटरप्राईजेस दादासाहेब यमगर (युवा उद्योजक) यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तसेच तृतीय बक्षीस रु. ११००१/- आप्पा भिकाजी गोरड (सर) व युवराज भानुदास पिंगळे मेजर यांच्यावतीने देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ बक्षीस रु. ७००१ श्री. शिवानी ज्वेलर्स गोरडवाडी, माणिक कोकरे (ग्रा.पं.सदस्य) यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तर पाचवे बक्षीस रु. ५००१ संजय हुलगे (माळशिरस ता. पत्रकार संघाचे सचिव) आणि चि. संजय कोळेकर (चेअरमन. बिरोबा दूध संकलन केंद्र गोरडवाडी) यांच्यावतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षिसे देखील असणार आहेत.

१) राजधानी ढाबा गोरडवाडी १००१ /-रू. मॅन ऑफ द सिरीज

२)  बिरा केरबा वाघमोडे ५०१/- रू. सलग चार चौकार

३)  भारत रघुनाथ गोरड १००१/- रू. सलग चार विकेट

४)  सचिन कदम ५०१/- रु. उत्कृष्ठ गोलंदाज

५) अर्जुन नारायण गोरड ५०१/- रू. सलग चार षटकार

६)  आप्पासाहेब सुळ ५०१/- रु. उत्कृष्ठ फलंदाज

७)  संपत गोरड (तरकारी) १००१/- रू. मॅन ऑफ द मॅच

८)  शिवाजी गोरड ५०१/- रु. उत्कृष्ठ झेल

बॉल बॉक्स

९) हेल्थ केअर मेडिकल गोरडवाडी

२) माने कृषी सेवा गोरडवाडी

कै. रामचंद्र (बापू) मारूती गोरड सर्व क्रिकेट कीटस्

नियम अटी

  • सामने गाववाईज पध्दतीने राहतील

(फक्त २ आयकॉन चालतील) पंचाचा निर्णय अंतिम राहिल

  • खेळाडूची शारीरीक जबाबदारी स्वत:वर राहिल.
  • सामना सहा षटकाचा राहिल.

एन्ट्री की ६००/-

  • संपर्क

शंकर गोरड – ८४८५८५८८०७, बापू गोरड – ७०३८५४५३५९, भारत कळसुले – ९९२२२७१२९८, अमोल गोरड – ७७५६०५९५१४, राहुल हुलगे – ९६६५३००९१८, शशिकांत कोकरे – ९६२३८००९८१

तरी जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी आणि क्रिकेट शौकीनांनी या स्पर्ध्येचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआपली गुढी भगव्या पताक्याचीच का ? – डॉ. श्रीमंत कोकाटे
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अरविंद लोंढे यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here