श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे तीन लाख में. टन ऊस गाळप पूर्ण.

सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचेकडून मुकादम व ऊस वाहतूकदारांचा सन्मान.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरच्या तीन लाख मे. टनच्या पुढील पहिल्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचे पूजन सोमवार दि. 21 रोजी, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन श्री. जयसिंह मोहिते – पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते मुकादम व ऊस वाहक संजय शेंडे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार रामभाऊ सातपुते, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, संचालक बाबाराजे देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, दत्तात्रय रणवरे, दत्तात्रय वाघमोडे, रामदास कर्णे, धोंडीराम नाळे, सुरेश पाटील, सुरेश मोहिते, नंदन दाते, शिवाजी गोरे, सुनील माने, चंद्रकांत शिंदे, रमेश जगताप, सुरेश मोहिते, शिवाजी लवटे, दादा वाघमोडे, विलास फडतरे, RPI चे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, तुकाराम चव्हाण, लालखान पठाण, अभिमान सावंत, बिनू पाटील, अमर गोरे, एकनाथ वाघमोडे आदी मान्यवर तसेच शंकर सहकारीचे सभासद, शेतकरी, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleExactly what the Most buy pet supplies Rare Animals In Of india?
Next articleअहो, भाऊसाहेब.. काल काय वाचलंय, ऐकलंय ते खरं हाय का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here