सदाशिवनगर साखर कारखान्याच्या कामगारांचे थकित वेतन, प्रायव्हेडेंट फंड शेतकऱ्यांचे थकित ऊस बिलाची रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा 48 वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 28 10 20 21 रोजी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे त्यामुळे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पुजनाला थकीत वेतनासाठी कामगार गाळपासाठी घातलेल्या ऊसाचे सभासद शेतकरी यांचे ऊस बिलाचे पैसे न मिळाल्याने कामगार सभासद शेतकऱ्यांचा भडका उडणार असल्याचे बोलले जात आहे सदाशिवनगर साखर कारखान्याच्या कामगारांचे थकित वेतन सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे प्रायव्हेडेट फंड गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे थकित बिलाची रक्कम मिळण्यासाठी कामगार सभासद शेतकरी व शेतकरी संघटना यांचे प्रयत्न सुरू आहेत.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर तालुका माळशिरस या कारखान्याकडे कारखाना सुरू असताना गाळपासाठी घातलेल्या उसाचे बिल मिळालेले नव्हते कामगारांनी काम केलेले पगाराचे पैसे थकवलेले होते.सदरचा कारखाना बंद पडला होता.कारखान्यावर प्रशासक नेमलेले होते.कारखान्याची न्यायालयीन लढाई सभासदांनी जिंकून कारखान्याची निवडणूक लावलेली होती. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे निवडणुकीत सभासद शेतकरी यांनी कारखाना सुरू होईल थकीत कामगारांचे व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांचे थकित बिलाची रक्कम मिळेल या भोळ्या आशेने मतदान करून कारखाना ताब्यात देण्यात आलेला होता.नवनियुक्त संचालक मंडळ यांनी चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या गळ्यात माळ घातली. त्यामुळे सभासद कामगारांच्या अशा वाढलेल्या होत्या कारखाना सुरू होईल मात्र चेअरमन पदाच्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कारकिर्दीचा तीन वर्षाचा कालावधी संपत आला तरीसुद्धा कारखाना सुरू झालेला नव्हता. सभासद व कामगार यांची हेळसांड सुरू होती यासाठी शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र तुपकर यांच्या सहकार्याने जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या मदतीने माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर यांनी तहसील कार्यालय माळशिरस येथे एक दिवशीय धरणे आंदोलन केले होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाला कारखान्याची जमीन भूसंपादन झालेली होती या जमिनीचा मिळालेल्या मोबदल्याच्या पैशातील शेतकऱ्यांना स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे 20 टक्के रक्कम मिळालेली होती. श्री शंकर सहकारी साखर कारखाना प्रशासनाने थकित एफ आर पी न देता कारखाना गेल्या गळीत हंगामाला बारा दिवस विना परवाना सुरू केलेला होता.साखर आयुक्त यांनी कारखान्याला विना परवानगी गाळपाचा 81 लाख रुपये दंड केलेला होता. यंदाचा गाळप हंगाम सुद्धा विनापरवाना सुरू करण्याचा कारखान्याचा मानस आहे त्यामुळे कामगारांच्या थकित वेतन सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे प्रायव्हेडेट फंड गाळपासाठी घातलेल्या ऊसाचे सभासद शेतकरी यांचे ऊस बिलाचे पैसे मिळवण्यासाठी कामगार सभासद शेतकरी यांचे एक मेकांना फोनाफोनी भेटीगाठी सुरू आहेत.शेतकरी संघटना यांच्याकडे शेतकरी अपेक्षेने येत आहेत शेतकरी संघटना सुद्धा जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदने विचार-विनिमय चर्चा सुरू आहे मोळी पूजनाला सभासद कामगार शेतकरी बांधव व शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुळी पूजनाच्या दिवशी भडका उडण्याची शक्यता चर्चेमधून होताना दिसत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng